• Sat. Sep 21st, 2024

धक्कादायक! तरुणाने कारसह पाण्यात झोकून देत केला जीव देण्याचा प्रयत्न, पण स्थानिक देवदूत बनले

धक्कादायक! तरुणाने कारसह पाण्यात झोकून देत केला जीव देण्याचा प्रयत्न, पण स्थानिक देवदूत बनले

ठाणे : नैराश्यातून तरुणाने कारसह थेट खाडीत उडी मारल्याची घटना ठाण्यातील कोलशेत येथील गणपती विसर्जन घाटावर मंगळवारी सायंकाळी घडली. यश बिसवास (२५) असे या तरुणाचे नाव असून तो बाळकुम येथील रहिवाशी आहे. या प्रकारानंतर प्रसंगावधान राखत स्थानिक रहिवाशी मनदीप शिल्पकार यांनी खाडीत उडी मारून यशचे प्राण वाचवले.

बाळकूम येथील हायलँड हॅवन टॉवरमध्ये राहणार्‍या यशने स्वत:ची गाडी घेत कोलशेत खाडी गाठली. त्यानंतर थेट गाडीसह खाडीच्या पाण्यात त्याने उडी मारली. भरती असल्याने गाडी काही काळ पाण्यावर तरंगत होती. त्यामुळे मनदीप यांनी यशला गाडीतून बाहेर काढून वाचवले. या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व बाळकूम अग्निशमन दलाचे स्टेशन आँफिसर ओंकार वैती यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बुडालेली कार इमर्जन्सी टेंडरच्या सहाय्याने ओढून बाहेर काढली.

सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाला धक्का, कुणी केला जय महाराष्ट्र, एकनाथ शिंदेंकडे इनकमिंग सुरुच

दरम्यान, या घटनेचा अधिक तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed