• Sat. Sep 21st, 2024

‘ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते ?’

‘ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते ?’

नाशिक : केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यात आलं आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि काही व्यापाऱ्यांनी आज कांद्यासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारपेठे सह जिल्ह्यातील बाजारपेठ मध्ये लिलाव बंद पुकारला आहे. या कांद्याच्या प्रश्नावर आज नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे माध्यमांशी संवाद साधत होते यावेळी त्यांनी कांद्याचे भाव वाढले त्यामुळे चार महिने कांदे खाऊ नका असा सल्ला दिला. पालकमंत्री दादा भुसे म्हणाले जर उद्या एक किलो कांदा २५ ते २० रुपयांवर गेल्यास कोणाला परवडत नसेल तर त्याने महिना दोन महिना चार महिने कांदे खाल्ला नाही तर काय बिघडतं, असा सवाल दादा भुसे यांनी केला आहे.

दादा भुसे यांनी सध्या कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे. ज्या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करणार आहेत त्या व्यापाऱ्यांमध्ये देखील थोडी भीती आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील आणि निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल, असं दादा भुसे म्हणाले.

Asia Cup चा संघ जाहीर करताना रोहित शर्मा भडकला, म्हणाला ‘…असा वेडेपणा आम्ही करत नाही’

कांद्याचा प्रश्न हा सत्ताधारी, विरोधक विषय नाही. काही वेळा कांद्याला एक क्विंटलला २०० ते ३०० रुपयांचा भाव मिळतो, काही वेळा २ हजार पर्यंत भाव जातो. यामुळे उत्पादन आणि पुरवठा यावर नियोजन करावं लागतं, असं दादा भुसे म्हणाले. कांदा प्रश्न हा नाशिक जिल्ह्यात संवेदनशील विषय आहे मात्र चर्चा करून मार्ग काढला जाईल आणि सर्व व्यवहार सुरळीत होतील, असं नियोजन केलं जाईल, असं दादा भुसे म्हणाले.
Chandrayaan 3 : चांद्रयान ३ च्या लँडिंगचं काऊंटडाऊन सुरु, वेळ ठरली पण प्लॅन बी तयार, इस्त्रोकडून मोठी अपडेट
कांद्याचे दर पडणार नाहीत याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, असं दादा भुसे म्हणाले. चांगल्या गोष्टीसाठी पवार साहेबच काय, कुणी पण असेल, चांगलं मार्गदर्शन असेल, तर स्वागतच असेल, असंही भुसे म्हणाले. कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करता, विचार विनिमय करून हा निर्णय व्हायला हवा होता, ही वस्तुस्थिती आहे, असं दादा भुसे म्हणाले. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला, तर काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळी आपण १ लाखांची गाडी वापरतो, त्यावेळी १० रुपये जास्त देऊन २० रुपये देऊन माल खरेदी करावा, असं दादा भुसे म्हणाले. ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते ?, असा सवाल देखील दादा भुसेंनी केला.

फक्त ८ मिनिटांत भारताचा आशिया कपचा संघ का बदलला, रोहित शर्मावर ओढवली नामुष्कीची वेळ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed