सिंधुदूर्ग : सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या देवगड निपाणी या राज्य महामार्गावर मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास कोकणातून कोल्हापूरच्या दिशेने गुरांना फोंडाघाट मार्गे कोल्हापूरला घेऊन जात असताना गावातील जागृत तरुणांनी पोलिसांना गुरांची होणारी बेकायदेशीर वाहतूक पकडून दिली आहे. त्यानंतर गुरांसहित तीनही वाहने कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. यामध्ये ३ पिकअप आणि १८ गुरे पकडण्यात आली आहेत. यामध्ये ६ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, या निमित्ताने फोंडाघाट गावातील पोलीस चेकपोस्टचा उपयोग काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
फोंडा चेकपोस्टवरून हे गुरांचे टेम्पो सहिसलामत जातात कसे? हा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी पोलिसांना उत्तर दिलं की त्यावेळी चेकपोस्टवरील कर्मचारी बाजूला गेला असेल, बाथरुमला वगैरेला गेला असेल किंवा डोळा लागला असेल. शेवटी तो ही माणूस आहे अशी उत्तरे पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

फोंडाघाट चेक पोस्टवरून नेहमी बेकायदेशीर अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र, या चेकपोस्टवर असलेले पोलीस कर्मचारी अवैध वाहतूकीकडे फारसं लक्ष देत नाही. फोंडाघाट चेकपोस्ट असलेल्या या मार्गावरून कोल्हापूरकडे दरवेळी दगडाची ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. मात्र, याकडे सुद्धा चेक पोस्टवरील पोलीस कर्मचारी दुर्लक्ष करत असतात.