• Mon. Nov 25th, 2024

    इन्स्टाग्रामवर प्रेम, लग्नापूर्वीच त्याने होणाऱ्या बायकोला कर्जबाजारी केलं; तरुणाचा प्रताप वाचून चक्रावाल

    इन्स्टाग्रामवर प्रेम, लग्नापूर्वीच त्याने होणाऱ्या बायकोला कर्जबाजारी केलं; तरुणाचा प्रताप वाचून चक्रावाल

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : एका खासगी कंपनीतील उच्चपदस्थ तरुणीचे इन्स्टाग्रामवरून एका तरुणाशी सूत जुळले. आधी मैत्री, नंतर प्रेम आणि दोन्ही कुटुंबांच्या परवानगीने लग्नही ठरले. यादरम्यान तरुणाचा मोबाइल बिघडला आणि नवीन मोबाइल खरेदी करण्यासाठी त्याने होणाऱ्या पत्नीचे क्रेडिट कार्ड वापरले. त्यावेळी तिने पिन क्रमांक दिला. त्यानंतर तरुणाने तिच्यावर तब्बल ३८ लाखांच्या कर्जाचा डोंगर उभा केला.

    काय आहे प्रकरण?

    गोरेगावच्या राखी (बदललेले नाव) हिची इन्स्टाग्रामवर प्रभादेवी येथील सौरव पवार या तरुणासोबत ओळख झाली. दोघेही एकमेकांसोबत चॅटिंगच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात भेटीगाठी होऊ लागल्या. या भेटीगाठींतून राखी सौरवच्या प्रेमात पडली. मात्र घरच्यांना अंधारात ठेवून भेटणे योग्य नसल्याने दोघांनी कुटुंबीयांची भेट घडवली. दोन्ही बाजूंकडून लग्नासाठी मान्यता देण्यात आल्याने राखी आणि सौरव खुश झाले. याचदरम्यान सौरव याचा मोबाइल बिघडला. नवीन मोबाइल घेण्यासाठी त्याने राखीकडे क्रेडिट कार्डची मागणी केली. तिच्याच मोबाइलवरून त्याने मोबाइल ऑर्डर केला. याचे पैसे मी भरेन, असे सौरव याने तिला सांगितल्याने राखी निश्चिंत होती.
    वाहने भाडेतत्त्वावर देताय? सावधान; मुंबईतील घटनेने डोळे उघडतील, मोठी गॅंग पोलिसांच्या ताब्यात
    राखी हिच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक माहीत असल्याने त्याने या क्रमांकाचा पुरेपूर फायदा घेतला. कधी लॅपटॉपसाठी, तर कधी नवीन कार खरेदी करण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून सौरवने वेगवेगळ्या ॲपवरून कर्ज घेतले. प्रत्येकवेळी तो कर्ज मी फेडणार आहे, असे सांगत असल्याने राखीने फारसे लक्ष दिले नाही. मात्र कर्जफेडीसाठी बँकांकडून आणि ॲपकडून तगादा सुरू होताच तिने रक्कम काढली असता पायाखालची वाळूच सरकली. तब्बल ३८ लाखांचे कर्ज घेऊन सौरवने हात वर केले. इतकी मोठी रक्कम फेडणे अशक्य असल्याने आणि होणाऱ्या पतीनेच विश्वासघात केल्याने राखी हिने पोलिस ठाण्यात तक्रार केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *