• Mon. Nov 25th, 2024
    काकाकडे राहायला आली; मात्र चुलत भावाचे गैरकृत्य, बहीण गर्भवती, वडील म्हणाले लग्न कर तर…

    अमरावती: घरी आलेल्या चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या भावाला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश (क्रमांक ४) आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने निकाल देत आरोपी भावाला १० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ३० नोव्हेंबर २०१७ रोजी शेंदूरजनाघाट ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती.
    औषध लावण्याच्या बहाण्याने बलात्कार; १६ वर्षीय पीडितेने मुलीला दिला जन्म, आरोपीचे वय ६३
    न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, पीडित १९ वर्षीय तरुणी ही मे २०१७ मध्ये आपल्या वडिलांसह काकाकडे गेली होती. वडील तिला काकाकडे सोडून गावी परतले. काकाकडे वास्तव्यास असताना आरोपी चुलत भावाने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी त्याने तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा पीडित तरुणीने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान, पीडित तरुणीला गर्भधारणा झाली. त्यामुळे पीडित तरुणीने याबाबत आपल्या आईला सांगितले. ही बाब कळताच पीडित तरुणीच्या वडिलांनी आरोपी चुलत भावास आपल्या मुलीसोबत लग्न करण्याबाबत विचारणा केली. मात्र आरोपी चुलत भाऊ आणि त्याच्या वडिलाने लग्नास नकार दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या पीडित तरुणीने ३० नोव्हेंबर २०१७ रोजी शेंदूरजनाघाट ठाण्यात दाखल केली.

    आंबेगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार; शस्त्रकियेनंतर महिलांचे हाल

    तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात न्या. आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयात १० साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने आरोपी वडिलांना चुलत भावास १० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता कौस्तुभ एस. लवाटे यांनी यशस्वी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विनोद बाभुळकर यांनी काम बघितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed