• Sat. Sep 21st, 2024
दोन आयशर ट्रकची समोरासमोर धडक; क्लीनरवर झोपेतच ओढवला मृत्यू, घटनेनं हळहळ

नांदेड: जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. शनिवारी सकाळी बिलोली तालुक्यातील आटकळी येथे दोन आयशर ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ट्रकमध्ये झोपेत असलेल्या एका ६० वर्षीय क्लीनरचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी असल्याची माहिती आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनर्थ टळला! समोरील वाहनाने दिली हूल; बसचालकाने राखले प्रसंगावधान, अन् वाचले प्रवाशांचे प्राण
मिळालेल्या माहितीनुसार, तेलगंणा राज्यातील आयशर क्रमांक टी.एस. १५ यु.ए.७२०२ हा ट्रक देगलूरमार्गे नांदेडकडे येत होता. तर प्लास्टिक पाईप घेऊन आयशर क्रमांक एम.पी ०९ जी. एफ ५४८६ हा ट्रक नांदेडहून हैदराबादकडे जात होता. शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बिलोली तालुक्यातील आटकळी मार्गावर येताच दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की धडकेनंतर ट्रकमध्ये झोपेत असलेले मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील युसूफ अब्दुल रहेमान (६०) हे क्लीनर काच फुटून खाली पडले. त्यात त्यांचा डोक्याला तसेच मानेवर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर दोन्ही आयशर ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. या घटनेनंतर तेलंगणा पासिंगचा ट्रकचालक फरार झाला आहे.

चालकाचं नियंत्रण सुटलं, जालना-पुसद बस कोसळली; २२ प्रवासी जखमी

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शवविच्छेदनानंतर युसूफ अब्दुल रहेमान यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले. मोहम्मद नासेर खान फत्तूखान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामतीर्थ पोलिसांकडून तेलगंणा पासिंग ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर अपघात घडत आहेत. अतिवेगाने वाहने चालवली जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed