काय घडलं?
पीडिता दिसत नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता एकाने तिला नेल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक हात तुटलेला तरुण तिला घेऊन जाताना दिसला. त्यानंतर कामगार चौक परिसरात पीडिता आढळली. संबधित तरुणाने अत्याचार केल्याची माहिती तिने दिली. पोलिसांनी तिच्याकडून आरोपीचे वर्णन ऐकून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीस एका तासात ताब्यात घेतले. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक स्वाती उचित, महिला अंमलदार प्रियांका तालवंदे, दीपक मतलबे, साळवे, सतवंत सोहळे, अविनाश ढगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. माहिती मिळाल्यावर पोलिस आयक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त चिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सचिन पागोटे तपास करीत आहेत.
दरम्यान, चौकशीत आरोपी विकृत असल्याचे समजले. तसेच यापूर्वीही त्याने एका महिलेची अश्लील छायाचित्रे समाज माध्यमावर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.