• Sat. Sep 21st, 2024
नाहूर उड्डाणपुलासाठी सहा मार्गिकांवर मध्यरात्री ब्लॉक; ‘या’ रेल्वेंच्या वेळांमध्ये बदल

मुंबई : नाहूर आणि मुलुंडदरम्यान दोन गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सहा मार्गिकांवर आज, शनिवारी मध्यरात्री १.२० ते रविवारी पहाटे ४.२० पर्यंत ब्लॉक घोषित केला आहे. नाहूर आणि मुलुंडदरम्यान वाहनांची वर्दळ वाढल्याने सध्याचा रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) अपुरा पडत आहे. यामुळे पुलाच्या रुंदीकरणासाठी एकूण १४ गर्डर उभारण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या दोन गर्डरच्या उभारणीसाठी आज शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

नाहूर-मुलुंड रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण

स्थानक – मुलुंड ते विक्रोळी

मार्ग – अप-डाउन धीम्या/जलद आणि पाचवी-सहावी मार्गिका

वेळ – शनिवारी मध्यरात्री १.२० ते रविवारी पहाटे ४.२०

४०-६० मिनिटे विलंबाने मेल-एक्स्प्रेस

-१८०३० शालिमार-एलटीटी

-१८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी

-२०१०४ गोरखपूर-एलटीटी

-१२७०२ हैद्रराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट

Mumbai Harbour Local: पनवेलकरांचे हाल; हार्बरचे वेळापत्रक ४५ दिवस अनियमित, कारण…
लोकलच्या वेळेत बदल

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल – शनिवारी मध्यरात्री १२.२४ कर्जत-सीएसएमटी

ब्लॉकनंतर पहिली लोकल – शनिवारी मध्यरात्री ३.५८ कल्याण-सीएसएमटी

ठाणे स्थानकात गर्डर उभारणीसाठी ब्लॉक

ठाणे रेल्वे स्थानकातील सीएसएमटी दिशेकडील पाच मीटर रुंद गर्डरच्या उभारणीसाठी अप आणि डाउन ट्रान्स हार्बर आणि सहाव्या मार्गिकेवर शनिवारी रात्री ११.३५ ते रविवारी पहाटे ४.३५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे ठाणे-वाशीदरम्यानच्या रात्री १०.४५, रात्री ११.४२, रात्री ११.४५, रात्री ११.०९, रात्री ११.२५ आणि रात्री ११.१८ या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Local: मुंबईकर रविवारी घराबाहेर पडताय तर ही बातमी वाचा, मध्य व पश्चिम रेल्वेवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed