मध्य रेल्वे
स्थानक – माटुंगा ते मुलुंड
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम – ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. ठाणे स्थानकाच्या पुढे लोकल फेऱ्या पुन्हा जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक – कुर्ला ते वाशी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर / वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे
स्थानक – बोरिवली ते भाईंदर
मार्ग – अप धीमी आणि डाउन जलद
वेळ – शनिवारी मध्यरात्री १२.४० ते रविवारी पहाटे ४.४०
परिणाम – ब्लॉक वेळेत अप धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या विरार/वसई रोड ते बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावर आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या गोरेगाव ते वसई रोड/विरारदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.