• Mon. Nov 25th, 2024

    पुण्यातील पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान, आरोपीच्या अटकेसाठी भाजपचे टाळाठोको आंदोलन

    पुण्यातील पबमध्ये तिरंगा ध्वजाचा अवमान, आरोपीच्या अटकेसाठी भाजपचे टाळाठोको आंदोलन

    पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल फ्रीक – सुपर क्लब या ठिकाणी १३ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री तिरंगा ध्वजाचा अपमान झाला यासंदर्भात अतिशय साधी कलमं लावून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही आणि किंवा तत्सम कारवाई झाली नाही. तसेच ते हॉटेल अद्यापदेखील चालूचं आहे.

    या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे आणि आणि हॉटेल मालकाला सुद्धा अटक झाली पाहिजे. तसेच जोपर्यंत हॉटेल मालक आणि आरोपी जाहिरपणे माफी मागत नाहीत तोपर्यंत हे हॉटेल बंद रहावे ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आणि यातून सर्व पबचालकांना समज मिळावी, सर्रास चालणारे अवैध धंदे, धांगडधिंगे बंद व्हावे यासाठी हॉटेल फ्रिक ,सुपर क्लब,कोरेगाव पार्क याठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे टाळा ठोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हॉटेल पूर्णपणे बंद करण्यात आले.

    ५० वर्षांपासून राष्ट्रध्वजाची सेवा करणारा देशभक्त, मुलांनीही जपला वारसा

    भाजपा पुणे शहरअध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी युवा मोर्चा कॅन्टोन्मेंट मतदार संघ अध्यक्ष आशिष सुर्वे, शहर सरचिटणीस ओंकार केदारी, राजु परदेशी, प्रदेश पदाधिकारी अनिकेत हारपुडे, रोनक शेट्टी, ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष तुषार रायकर, युवा वॅारीयर्स अध्यक्ष प्रतिक गुजराथी, शहर पदाधिकारी प्रतीक कुंजीर, प्रणय शिंदे, सुरेंद्र ठाकूर, निलेश कांबळे, ओमकर धुमाळ इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

    जर उद्या परत हॉटेल सुरु झाले तर आम्ही ह्याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण राष्ट्रध्वज आमच्यासाठी जीवापेक्षा मोठा आहे असा इशारा युवा मोर्चा आणि युवा वरियर्स तर्फे देण्यात आला आहे.

    ‘शासन आपल्या दारी’मुळे ST बसेस बंद, विद्यार्थ्यांचे हाल, मदतीला पवारांचा आमदार धावला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *