• Sat. Sep 21st, 2024

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शिंदे गटातील १२ आमदारांचा प्रयत्न, मातोश्रीवर फोनही गेला पण…

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शिंदे गटातील १२ आमदारांचा प्रयत्न, मातोश्रीवर फोनही गेला पण…

मुंबई: सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या गाठीभेटींची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात शिवसेना पक्षात काही गुप्त हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात असलेली राजकीय केमेस्ट्री बिघडण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शिंदे गटातील काही नाराज आमदारांकडून उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी म्हणजे २७ जुलैला शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. या आमदारांना उद्धव ठाकरे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यासाठी संबंधित आमदारांकडून मातोश्रीवर फोनही करण्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या संबंधित आमदारांना भेट नाकारल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचे कारण पुढे करत या आमदारांना भेटणे टाळले, असे ठाकरे गटाच्या गोटातून सांगितले जात आहे.

शरद पवारांना भाजपसोबत आणलंत तरच तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, PM मोदींची अजितदादांसमोर अट; वडेट्टीवारांचा दावा

तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आमच्यापैकी कोणीही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट उद्धव ठाकरे यांच्या गटातील १० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यापैकी सहा आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. मी आत्ता लगेच त्यांची नावं सांगू शकतो. परंतु, राजकारणात नैतिकता पाळायची असते, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Sharad Pawar: केंद्रीय कृषीमंत्रीपद किंवा निती आयोगाचे अध्यक्षपद; गुप्त बैठकीत अजितदादांची शरद पवारांना ऑफर?

हे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना त्यांना कधी उद्धव ठाकरे यांना भेटता आले नाही, त्यांच्याशी बोलता आले नाही. त्यामुळे ४० आमदारांनी बंड केले. या आमदारांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. अजित पवारही आता या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. ही एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आणि विकासाभिमुख राजकारणाला मिळालेली पोचपावती असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले.

सेनाभवनाबाहेर रश्मी ठाकरे महिलांच्या घोळक्यात; फोटो देत आपुलकीने विचारपूस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed