• Sat. Sep 21st, 2024
कळवा रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू; वरिष्ठांचा जाच, डॉक्टर्स मोठ्या निर्णयाच्या तयारीत, काय घडणार

ठाणे: कळवा रुग्णालयात गेल्या ३ दिवसात २७ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. हा वाढता मृत्यूचा आकडा पाहून एकच खळबळ उडाली असताना प्रशासनावर दबाव वाढला आहे. त्यातच आता राजकीय पक्षांनी रुग्णालयाला धारेवर धरले. त्यानंतर आता डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या जाचाला कंटाळून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता ठाणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Breaking News: पालिका रुग्णालयातील मृत्यूचे सत्र सुरूच; एक महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू
अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणि अव्यवस्थेमुळे एकीकडे कळवा रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरू असताना दुसरीकडे रुग्णालयातील अत्यंत महत्वाचा असणाऱ्या अपघात विभागातील सर्वच डॉक्टर्स राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांच्या त्रासाला कंटाळून हे सर्व जण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी कॅमेरासमोर न येण्याच्या अटीवर सांगितले आहे. अपघात विभागात दररोज ३५० ते ४०० च्या वर रुग्ण येत असताना जर डॉक्टरांनी राजीनामे दिले तर आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठाणे रुग्णालयात जीवाशी खेळ, भेट देऊन केदार दिघे, अविनाश जाधवांनी जाब विचारला

जिल्हा शासकीय रुग्णालय स्थलांतरित केल्यानंतर त्याचा ताण कळवा रुग्णालयात येतो आहे. त्यामुळे रुग्ण वाढून दररोज ३५० ते ४०० पर्यंत रुग्ण याठिकाणी येत आहेत. यामुळे डॉक्टरांची कमालीची दमछाक होत असून त्याही वातावरणात डॉक्टर्स काम करत आहेत. मात्र आम्ही काम करायचे की वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मानसिक त्रास सहन करायचा? असा सवाल हे डॉक्टर्स करत आहे. त्यामुळे या त्रासाला कंटाळून हे सर्व डॉक्टर्स राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी नाव न सांगण्याच्या आणि कॅमेऱ्या समोर न येण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे अशीच यंत्रणा कोलमडून पडलेली असताना जर या डॉक्टरांनी राजीनामा दिला तर फार भयानक स्थिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed