राजेश कौशल यांनी पिंपरी चिंचवड शहरात गुन्हे शाखेत त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. त्यांच्या कामगिरीने त्यांनी त्यांचा वचक निर्माण केला होता. साधारण २००८ साली ते पोलिसात भरती झाले होते. २०१८ मध्ये ते पिंपरी चिंचवड पोलिस दलामध्ये आले रुजू झाले होते. अतिशय मनमिळावू, सर्वांशी मनमोकळेपणाने बोलणे, सर्वांशी आपलेपणाने राहणे हा त्यांचा स्वभाव होता.
त्यांच्या अपघाताची माहिती त्यांच्या विभागाला मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी वायासीएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र जखमी गंभीर असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याने पोलिस दलवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या घरी पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
राजेश कौशल यांना समाजसेवेची खूप आवड होती. अनेक सामाजिक उपक्रमात ते सहभागी होत असतं मात्र त्याचा गवगवा त्यांनी कधीही केला नाही. त्यांनी जिवंतपणीच अवयव दानाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी अर्ज देखील भरला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्यांनी देखील अवयव दानासाठी संमती दिली.आज सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली असता त्यांचे अवयव दान करण्यात आले. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
कसा झाला होता अपघात
२ ऑगस्ट रोजी रात्री राजेश कौशल हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. मोशी परिसरात त्यांच्या दुचाकीला अचानक कुत्रा आडवा आला. त्या कुत्र्याला वाचविण्याच्या नादात त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा अपघात झाला. त्यांनी डोक्यात घातलेले हेल्मेट डोक्यातून निसटून बाजूला पडले. त्यामुळे ते त्यात गंभीर जखमी झाले होते. रात्री उशिराची वेळ असल्याने त्यांना वेळेत मदत मिळाली नाही. त्यानंतर एका बस चालकाला ते रस्त्यावर पडलेले दिसले. त्यानंतर त्या चालकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.