• Sat. Sep 21st, 2024
एकनाथ खडसेंचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले- एकनाथ शिंदे आमदारांसह भाजपमध्ये जातील हा निर्णय…

जळगाव: एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार हे भाजपमध्ये जातील हा निर्णय आजचा नाही हा निर्णय आधीच झालेला आहे. नाईलाज असतो का होईना अपात्रता टाळण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना भाजपमध्ये जावं लागेल, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्या आदेशानुसार कमळ चिन्हावर सुद्धा निवडणूक लढवू, असे वक्तव्य केले आहे. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच विषयावर मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कळवा रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू; वरिष्ठांचा जाच, डॉक्टर्स मोठ्या निर्णयाच्या तयारीत, काय घडणार
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास अपात्रता वाचविण्यासाठी त्यांच्याकडे दोनच पर्याय आहे. एकतर पक्ष बदलणे किंवा दुसऱ्या पक्षात संमिलित होणे. त्यानुसार सर्व आमदार भाजपमध्ये गेले तर त्यांच्या अपात्रता वाचू शकते. त्यामुळे आज तरी या शिंदेंच्या आमदारांसोबत अपात्रतेच संकट आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तर भाजपमध्ये गेले तर भाजपमधील लोकांचे काय असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतील. मात्र तो त्यांचा प्रश्न आहे, असे सुद्धा यावेळी एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर जिल्हा अन् रामदास आठवले, शरद पवारांनी जुनी आठवण सांगितली, सगळेच खळखळून हसले

ते पुढे म्हणाले की, अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेली भेट ही कौटुंबिक भेट असल्याचे शरद पवार यांनी सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसेच पाऊस लांबणीवर गेल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यातही ही स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प मध्येही पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे शेतकऱ्याची गंभीर परिस्थिती होईल. निसर्गाने जो अंदाज व्यक्त केला होता, तो मात्र खरा ठरला नाही, अशी खंत यावेळी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed