• Mon. Nov 25th, 2024

    अगोदर वाई न्यायालयात गोळीबार आता सातारा कारागृहात दोन गट भिडले, पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये..

    अगोदर वाई न्यायालयात गोळीबार आता सातारा कारागृहात दोन गट भिडले, पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये..

    सातारा : वाई न्यायालयात गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबारानंतर जिल्हा कारागृहातही जाधव आणि नवघणे यांच्या समर्थकांच्यात हाणामारी झाली. बंटी जाधव याच्या समर्थकांनी गोळीबार करणाऱ्या राजेश चंद्रकांत नवघणे आणि त्याच्या दोन साथीदारांवर जिल्हा कारागृहात हल्ला केला. मनोज वाघमारे, सिद्धेश घाडगे आणि परमेश्वर जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या बंटी जाधवच्या समर्थकांची नावे आहेत. हल्ला करणाऱ्या तिघांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

    बंटी जाधव, निखिल मोरे व अभिजित शिवाजी मोरे या तिघांनी कळंबा कारागृहातून राजेश चंद्रकांत नवघणे या हॉटेल व्यावसायिकाला दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी कळंबा कारागृहातून नवघणे याला फोन करून वारंवार धमक्या दिल्या होत्या. तसेच १ जून २०२३ रोजी मेणवलीतील हॉटेल माघवन इंटरनॅशनल येथे त्याने १३ साथीदारांना पाठवून . नवघणेला पिस्तूलचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केली, तसेच दरोडा टाकून दीड तोळ्याची सोन्याची चेन चोरून नेली होती. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात १५ जणांवर खंडणी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

    आजारपणाचं कारण पुढे करणार, शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव : वडेट्टीवार

    या गुन्ह्यामध्ये मुख्य संशयित अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) निखिल मोरे व अभिजित शिवाजी मोरे (दोघेही रा. गंगापुरी) यांना सोमवारी (ता. ७) दुपारी बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणले होते. त्यांना न्यायालयाचे बाहेरील कक्षाचे बाकड्यावर बसवले होते. त्या वेळी नवघणे याने वकिलाचे वेशामध्ये फाइलमध्ये लपवून आणलेल्या पिस्तुलातून तिघांच्या दिशेने गोळीबार केला होता. या वेळी पोलिसांनी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करत नवघणे यास ताब्यात घेतले.

    चंद्राच्या जवळ पोहोचलो; इस्रोने चांद्रयान-३ बाबत मोठी अपडेट, या दिवशी होणार ‘सॉफ्ट लँडिंग’

    बराकीमधून बाहेर काढले अन् हाणामारी

    या गुन्ह्यात राजेश नवघणे आणि त्याचे दोन साथीदार शरदराव रवींद्र पवार (रा. बावधन नाका, वाई ) व विजय लक्ष्मण अंकोशी (रा. काशीकापडी झोपडपट्टी, वाई) हे सहभागी असल्याचे समोर आले. त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. याठिकाणी बंटी जाधवचा साथीदार मनोज वाघमारे हा होता, तसेच बंटी जाधवचे अन्य साथीदार नीलेश घाडगे, परमेश्वर जाधव होता. जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्यांना दररोज सकाळी दहा ते बारा या कालावधीत बराकीमधून बाहेर सोडले जाते, त्यानुसार आज सर्वाना बाहेर सोडण्यात आले होते. दुपारी बंटी जाधवच्या समर्थकांनी विजय अंकोशी याला दगडाने, तर राजेश आणि रवींद्र यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी कारागृह पोलिसाच्या फिर्यादीवरून तिघांवर मारहाणीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी जखमीचे जबाब नोंदवले. त्यानुसार तीन संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Breaking News: पालिका रुग्णालयातील मृत्यूचे सत्र सुरूच; एक महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू

    खंबाटकी नजीक कॅनॉलमध्ये कार कोसळली, रेस्क्यूचा थरार, ५ जण बचावले!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed