• Mon. Nov 25th, 2024

    ५० प्रवाशांसह धावणाऱ्या एसटीचा रॉड तुटला; चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला, मात्र दुसरी बस मागताच..

    ५० प्रवाशांसह धावणाऱ्या एसटीचा रॉड तुटला; चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला, मात्र दुसरी बस मागताच..

    जळगाव: जळगाव बसस्थानकातून पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावी जात असलेल्या जळगाव-बांबरुड बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ ही घटना घडली. अपघातावेळी बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. अशातच बसचे नियंत्रण सुटलेले असतानाही चालकाने सतर्कता दाखवत बस रस्त्याच्या एका बाजूला सुरक्षितपणे उभी करण्यास यश मिळविल्याने अनर्थ टळला. हेमंत पाटील असे बसचालकाचे नाव असून ते बस चालक नाही तर आमच्यासाठी देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, दुसरी बस मागितल्याचा रागातून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने चालकासह प्रवाशांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावाला जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास जळगाव बसस्थानकातून जळगाव डेपोची बस निघाली होती. या बसने जळगाव सोडल्यानंतर प्रवासात शिरसोली गावाजवळ बसच्या पुढील चाकाजवळचा रॉड तुटल्याने बस खाली झुकली. यातच चालकाचे स्टेरींगवरील नियंत्रण सुटले. मात्र, यानंतरही समयसूचकता दाखवत अनुभवी असलेल्या चालक हेमंत पाटील यांनी बस कशी तरी रस्त्याचा कडेला लावण्यात यश मिळविले. त्यामुळे अपघात होवून मोठा अनर्थ टळला. चालक हेमंत पाटी यांनी सतर्कता दाखवित बस थांबविली अन्यथा आमच्यासोबत काय घडले असते, घरी लहान लहान मुले होती, अस म्हणत बस मधील प्रवाशांनी चालक पाटील हे आमच्या साठी देवदुत ठरल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी चालक हेमंत पाटील यांचे दाखविलेल्या सतर्कबद्दल प्रवाशांनी टाळ्या वाजवून तसेच त्यांना श्रीफळ देवून त्यांचे स्वागत तसेच सत्कार केला.

    चालक नाही हा परमेश्वरच; प्रसंगावधान दाखवलं, जीव वाचवला, प्रवाशांकडून कौतुक

    दुसरी बस पाठविली पण ती सुध्दा काही अंतरावर झाली खराब:

    या घटनेनंतर एस.टी मंडळाकडून दुसरी बस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, ती देखील काही अंतर गेल्यावर खराब झाल्याने प्रवाशांनी आणखीनच संताप व्यक्त केला. एस टी मंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप यावेळी बसमधील प्रवाशी महिलांनी करत मुख्यमंत्र्यांनी याकडे आणि अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे जातीने लक्ष घालून त्यांना ठिकाणावर आणावे. नाही तर आम्हीच त्याला ठिकाणावर आणनार असल्याची भूमिका प्रवाशी महिलांनी जाहीर केली आहे. शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

    या बसचे चालक हेमंत पाटील यांच्यावर एसटी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली तर आम्ही सर्व महिला किंवा यापेक्षा अधिक दुपटीने महिला घेवून आम्ही जळगाव बस डेपोवर मोर्चा काढू असा इशाराही यावेळी प्रवाशी महिलांनी दिला आहे. या घटनेसंदर्भात जळगाव एस टी मंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना विचारले असता त्यांनी प्रवाशांच्या मागणी नुसार त्वरित दुसरी बस उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. त्याच बरोबर वाहतूक अधीक्षक हे जबाबदार अधिकारी असून ते शिव्या देऊ शकणार नाहीत आणि त्यांनी शिव्या दिल्या असतील तर प्रवाशांनी पुरावे द्यावे अशी भूमिका मांडत जगनोर यांनी त्याच्याच अधिकाऱ्याची बाजू घेतली आहे.

    घरापासून एक किलोमीटरवर असताना कुटुंब संपलं, आई वडिलांसह लेकीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेनं अनर्थ, चंद्रपूरकर सुन्न

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *