• Sat. Sep 21st, 2024
वडील सुट्टीनिमित्त घरी आले; गावी गेल्यानंतर घरी एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपवले

छत्रपती संभाजीनगर: सैन्यात नोकरीला असलेले वडील घरी आले आणि आपल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी गावी गेले. यावेळी अभ्यासात हुशार असलेल्या बारावीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेत आपले आयुष्य संपवले. ही घटना गुरुवारी चार वाजता साउथ सिटी आदर्श कॉलनी तिसगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये खळबळ उडाली आहे .

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ विठ्ठल मिसाळ (वय १७ वर्षे, रा. साउथ सिटी आदर्श कॉलनी तिसगाव असे आयुष्य संपवलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभचे वडील सैन्यात नोकरीला आहेत, तर आई गृहिणी आहे. सौरभला एक लहान बहीण आहे. सौरभचे वडील सैन्यात असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना सुट्टी मिळाली होती. त्यामुळे ते घरी आले होते.

धक्कादायक! चहा पिताच १८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
घरी आल्यानंतर त्यांनी गावाकडे आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सौरभची बारावीची परीक्षा आणि निश्चित तयारी सुरू असल्यामुळे त्याला अभ्यास करण्यासाठी घरीच राहावं लागलं. यामुळे सौरभचे वडील आई आणि बहीण तिघे गावी गेले यावेळी सौरभ घरी एकटाच होता. दरम्यान सौरभची मावशी घरात शेजारीच राहते. यामुळे सौरभच्या जेवणाची जबाबदारी मावशीकडे होती.

श्वानप्रेमींसाठी खूशखबर, आता श्वान-मांजरांना मिळणार विमा; आजारपण, हरवल्यास मिळणार संरक्षण
सकाळी सौरभ घरीच होता. दुपारी क्लासला जातो असं त्याने त्याच्या काकांना सांगितलं होतं. मात्र तो दुपारी घरीच होता. सायंकाळी चार वाजता तो घरातच होता, मात्र मावशीला वाटलं की तो घरामध्ये आराम करत असेल. यामुळे तिने त्याला आवाज दिला नाही. मात्र बराच वेळ झाला सौरभ घराबाहेर पडलाच नाही. यामुळे काकांनी आवाज दिला असता प्रतिसाद आला नाही. खिडकीतून बघितले असता सौरभाने आपले जीवन संपवल्याचे दिसले.

हिंडेनबर्गने पार बुडवले, एक गौप्यस्फोट आणि तीन अब्जाधीशांचे ₹ ८१,९७,०२,१८,००,००० चे नुकसान
या घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने त्याला घाटी रुग्णाला दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सौरभने हे टोकाचे पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूचे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार कासर्ले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed