• Mon. Nov 25th, 2024

    सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर १२ किमी रांगा; वाहतूक संथ गतीने

    सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर १२ किमी रांगा; वाहतूक संथ गतीने

    लोणावळा : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर सकाळपासूनच वाहनांच्या खंडाळा बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

    पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर गेल्या काही दिवसांपासून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. ते आता सुरळीत झाले असून पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सलग सुट्ट्या आल्याने अनेकजण आपल्या गावी जात असतात. मात्र आज सकाळपासूनच खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.

    पुणे-मुंबई महामार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी पहायला मिळते. मात्र अनेक नागरिक फिरण्यासाठी, गावाकडे जाण्यासाठी बाहेर पडल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. १२ किमीच्या रांगा लागल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागच्या महिन्यामध्ये घाट परिसरात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण देखील वाढले होते. त्यानंतर प्रशासनाकडून त्वरित दखल घेण्यात येऊन दरडी हटवले गेल्या. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

    मात्र सलग सुट्टी आल्याने अनेक नागरिक घराच्या बाहेर पडत असून एक्स्प्रेस वे ने प्रवास करतात. त्यामुळे खंडाळा घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

    पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, चांदणी चौकातील पूल वाहतुकीसाठी खुला होणार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed