• Tue. Nov 26th, 2024

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची १२ व १४ ऑगस्ट रोजी मुलाखत

    ByMH LIVE NEWS

    Aug 11, 2023
    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची १२ व १४ ऑगस्ट रोजी मुलाखत

    मुंबई, दि. ११ : राज्यात वैद्यकशास्त्रात समतोल विकास साधणे आणि वैद्यक शाखेतील विविध अभ्यासक्रमात एकरूपता आणण्यासाठी विभागामार्फत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांनी दिलखुलास कार्यक्रमातून सांगितले आहे.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमार्फत शैक्षणिक सेवा तसेच रुग्ण सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाश्वत उपयायोजना तसेच विविध उपक्रम शासनस्तरावर राबविण्यात येत आहे. रूग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी राज्यभरात विविध शिबीरे आयोजित केली जात आहेत. तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर नव्याने वैद्यकीय महाविद्यालय आणि बीएस्सी नर्सिग अभ्यासक्रम सुरू करून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करूण देणे, वैद्यकीय शिक्षण विभगातील रिक्तपदांबाबत पदभरतीचा निर्णय घेणे असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि.12, आणि सोमवार दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    ००००

    जयश्री कोल्हे/स.सं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed