• Sat. Sep 21st, 2024

वादानंतर दोन गटांत दगडफेक आणि तणाव; शालेय विद्यार्थ्यांनी एका कृतीतून उघडले समाजाचे डोळे

वादानंतर दोन गटांत दगडफेक आणि तणाव; शालेय विद्यार्थ्यांनी एका कृतीतून उघडले समाजाचे डोळे

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात गुरूवारी सायंकाळी एका समाजाचे बॅनर पाडण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. या वादात दोन गट भिडल्यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर गावात एकीकडे तणावचं वातावरण निर्माण झालेले असताना दुसरीकडे याच गावातील शाळा मात्र नियमितपणे भरल्याचं दिसून आलं.
डिजिटल बॅनर फाडल्याच्या वाद, धुळ्यातील सांगवीत दोन गटात राडा, २०० संशयितांवर गुन्हा
शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त लावण्यात आलेले एक बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आल्याचा प्रकार घडला. यानंतर या ठिकाणी दोन गटांत वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर दंगलीत झाल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी आदिवासी बांधवांकडून रस्ता रोको करत बॅनर फाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शरद पवार गटाला धक्का, पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत विश्वासू नेत्याचा NCPला रामराम
घटनेनंतर जमावाकडून शिरपूर तालुक्यातील भाजप आमदार काशीराम पावरा, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठं पाऊल उचलावं लागलं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दरम्यान, या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल झालेल्या घटनेनंतर गावातील सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली. गावात अजूनही भीतीचे आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

धुळ्यात मॉक ड्रिलदरम्यान भलताच राडा, ‘बंदूकधारी दहशतवाद्या’ला नागरिकांनी कानशिलातच लगावली

दुसरीकडे याच गावात असलेली एक शाळा आज सकाळी नियमितपणे भरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय दिसून आली. यामुळे गावात काल झालेला दोन समाजातील वाद कुणामुळे झाला हा तपासाचा भाग झाला असला तरी दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांचे शाळेतील वातावरण दिलासादायक देणारे ठरले. ज्या दोन समाजातील नागरिकांनी एकत्र येत हा वाद वाढवला त्याच दोन समाजातील विद्यार्थी मात्र शाळेत गुण्यागोविंदाने शिक्षण घेत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. झालेला वाद हा तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी त्याचा परिणाम उद्याचे भवितव्य घडवणाऱ्या पिढीवर झालेला नाही, हेच या निमित्ताने दिसून आले. आणि यातून एक मोठा संदेश विद्यार्थ्यांनी समाजाला दिलेला आणि त्यातून सर्वांनी शिकण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed