• Sat. Sep 21st, 2024

सावधान! राज्यात डोळ्यांची साथ वाढलीय, आतापर्यंत अडीच लाख रुग्णांची नोंद, या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण

सावधान! राज्यात डोळ्यांची साथ वाढलीय, आतापर्यंत अडीच लाख रुग्णांची नोंद, या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये डोळ्यांची साथ येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दहा ऑगस्टपर्यंत राज्यात ३ लाख ५७ हजार २६५ जणांना डोळे आले आहेत. ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे, त्या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

बुलढाणा, पुणे, जळगाव, नांदेड, अकोला, वर्धा, नंदुरबार, भंडारा येथे हे प्रमाण सर्वाधिक असून, मुंबई, नागपूर, गडचिरोली, बीड, रायगड, लातूर, नवी मुंबई येथे तुलनेने ही साथ कमी फैलावली आहे. कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी निजामपूर, अकोला पालिका क्षेत्रांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. तरीही सर्व जिल्ह्यांना ही साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाइप करून देण्यात आले आहे. ज्या भागामध्ये साथ सुरू झाली त्या भागातील शाळेतील मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

काय घ्यावी काळजी?

डोळे येण्याचा त्रास हा मुख्यत्वे अॅडिनो विषाणूमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग असून यामध्ये रुग्णाचा डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे दिसतात. हा आजार होऊ नये, म्हणून वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यात वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे या गोष्टींचा समावेश आहे. तसेच डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वतःला घरामध्ये विलगीकरणामध्ये ठेवणे गरजेचे आहे.
डोळे येण्याच्या साथीमुळं पालकांची चिंता वाढली; पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी, कशी घ्याल काळजी?
जिल्हा- रुग्णसंख्या
मुंबई -२८६२
पालघर – १९७७
रायगड – ८१६
नवी मुंबई – ६९०
ठाणे (मनपा)- ४१४
ठाणे – १८६
कल्याण डोंबिवली पालिका- ५८
उल्हासनगर (पालिका)- २०
राज्य एकूण- ३५७२२६५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed