भाईंदर येथील उत्तन डेपोची निवड
आधीची जागा तीन गावांमध्ये पसरलेली होती. यापैकी काही भाग हा निवासी क्षेत्रात आणि काही भाग अविकसित होता. या प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध होता. या मार्गावर १०० फूट रस्ता आणि ३२ एकरात पसरलेल्या मेट्रो कारशेडमुळे जवळपास ५४७ कुटुंबांना आपली घरं गमवावी लागली असल्याचा आरोप केला गेला. आता एमएमआरडीएला नवीन डेपो साइटशी जोडण्यासाठी साडे तीन किमीची लाईन वाढवावी लागणार आहे, यासाठी कोणताही आक्षेप नाही.
MMRDA मेट्रो १२ अर्थात कल्याण – तळोजा ते मेट्रो ५ अर्थात ठाणे – भिवंडी कल्याणला जोडण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या मार्गासाठी निलजेपाड्यातील ११६ एकर जमीन घेण्यात आली आहे. हे मार्ग एमकमेकांना कनेक्ट झाल्यास ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण करणं शक्य होईल.
सर्व मेट्रो प्रकल्पांची कामं वेगाने सुरू असून या डेपो भूखंडांचं संपादन झाल्यानंतर ही कामं लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती महानगर आयुक्त अंजय मुखर्जी यांनी दिली आहे.
किती खर्च येणार?
या संपूर्ण प्रोजेक्टसाठी जवळपास ६,५१८ कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती आहे. ऑक्टोबर २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी शक्यता आहे.
मेट्रो लाईन ९ आणि ७ए डेपो मार्ग
भाईंदर येथील उत्तन डेपोसाठी १४७.५ एकर जमीन घेण्यात आली आहे. या मेट्रो मार्गाची लांबी ३.२ किमी इतकी असेल. लाईन ७ए या मार्गावर दोन स्टेशन असतील, एयरपोर्ट कॉलनी आणि T2 एयरपोर्ट. आतापर्यंत या मार्गासाठीचं १५ टक्के काम पूर्ण झालं आहे.
याच मार्गावर मेट्रो लाईन ९ हा मार्ग दहिसर पूर्व ते भाईंदर असेल. या मार्गाची लांबी १४.५ किमी असेल. या मार्गावर ८ स्थानकं असतील. दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव, काशीगाव, साईबाबा नगर, मेदिटिया नगर, शहिद भगत सिंह गार्डन, सुभाष चंद्र बोस स्टेडियम अशी आठ स्टेशन्स असतील. या मार्गाचं आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झालं आहे.