पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी आयटी पार्क येथे कामाला असणाऱ्या आयटी अभियंत्याला ठार मारून त्याचा मृतदेह खेड तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीत फेकला होता. आता या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. खुन्नसने पाहिले म्हणून आयटी अभियंत्याला संपवले असल्याचे आरोपीने सांगितले.
सौरभ पाटील असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. तर मयूर दळवी असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झालेल्या वादातून सौरभ पाटील याची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
संजिवनी कॉलेज कोपरगाव येथे शिक्षण घेत असताना खुन्नसने पाहिल्याच्या कारणावरून आरोपी मयूर दळवी आणि मृत सौरभ पाटील या दोघांचे भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मयुरच्या मनात होता. त्यावरून मयूर याने सौरभ याची आधी चाकूने वार करून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

सौरभ पाटील हा २८ जुलैपासून हिंजवडी परिसरातून गायब होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी हिंजवडी पोलिसांनी मिसिंग असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सौरभ याची गाडी खेड तालुक्यातील सांडभोरवाडी गावाजवळ आढळली होती. त्यानंतर परवा दिवशी जुन्या खेड घाटात डोंगर उतारावर बेवारस मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत थेट कोपरगाव येथून या हत्येमागे मास्टर माईंड असलेल्या मयूर दळवी याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.