• Mon. Nov 25th, 2024
    Success Story : पत्रकार ते पोलीस! डोक्याला गंभीर इजा पण स्वप्नांनी झोप उडवली, वाचा कोल्हापुरच्या पोराची यशोगाथा

    कोल्हापूर : या जगात प्रत्येकाला कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नसतं अशातच अनेक वेळा घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपल्या स्वप्नाकडे वाटचाल करावी लागते. मात्र, अनेक वेळा मुलं जबाबदारीमुळे आपलं स्वप्न बाजूला ठेवून वेगळ्या क्षेत्रात जाऊन काम करतात. कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये हा त्याला अपवाद ठरला आहे. संगणक अभियंता असलेला सुशांत काही काळ पत्रकारिता करत आता थेट पोलीस झाला आहे.

    ७ वर्षांचा असताना अपघातात मेंदूला मार

    ज्योतिबा पर्यटन आणि धार्मिक क्षेत्र असल्याने येथे रोजगाराच्या अनेक संधी असल्याने शालेय शिक्षण झाले की युवक रोजगाराकडे वळतात. सुशांत उपाध्ये हा याच जोतिबाच्या डोंगरावरील रहिवाशी. वडील परंपरागत जोतीबाचे पुजारी. सुशांत अवघा ७ वर्षाचा असताना त्याचा एक अपघात झाला. यात त्याच्या मेंदूला मारही लागला. यामुळे सुशांत नेहमी शांत शांत असायचा. यामुळे पुढे जाऊन हा शिकेल की नाही अशी घरच्यांना ही काळजी वाटत होती. अशातच सुशांत शालेय शिक्षणासाठी ज्योतिबा डोंगरावरीलच ज्योतिर्लिंग विद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीला त्याला त्रास झाला त्याच्यावर उपचार ही सुरु होते. यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि तो पहिली पासूनच शाळेत अव्वल असायचा तर २००७ साली दहावीत त्याने शाळेत ७५ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला.

    Success Story : वय १३ वर्ष अन् महिन्याचा पगार २ कोटी; वडिलांच्या थकव्याने सुचली आयडिया; वाचा टिळक मेहता यांची यशोगाथा

    ST मधील नोकरीची संधी नाकारत पत्रकारिता निवडली

    सुशांतने पुढेही शकत राहायचं ठरवलं आणि २००८ साली वारणा नगर इथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १२ वी नंतर त्याने कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज आणि शहाजी कॉलेजमधून २०१२-१३ साली बीसीए डिग्री घेतली. याच दरम्यान सुशांतने २०११ साली बी.सी.ए. द्वितीय वर्षात असताना पहिल्यांदा IBPS ची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली. मात्र, त्याने पुढील शिक्षण आणि छंद असलेल्या क्षेत्रात काम करायचं असल्याने नोकरी नाकारली आणि पत्रकरिकाता करण्यासाठी २०१५-१६ साली शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेत पदवीसाठी प्रवेश घेतला. पत्रकारितेत शिक्षण घेत असतानाच सुशांतने एका खाजगी वृत्तवाहिनीसोबत आणि जिल्हा माहिती कार्यालय येथे इंटरनशिप पूर्ण केलं तर २०१७ साली एका दैनिकात त्याने काम केलं. सोबतच स्वतःची जाहिरात आणि पब्लिक रिलेशन एजन्सी ही सुरू केली.

    Chandrayaan-3 : ISRO कडून आनंदाची बातमी, चांद्रयान-३ चंद्राच्या जवळ, जाणून घ्या आता किती अंतर…

    पोलीस उपनिरीक्षक पदी निवड …

    सुशांतचे सर्व काही उत्तम सुरू होतं. मात्र, त्याला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा होती. यामुळे त्याने २०१८ साली दैनिकातून राजीनामा दिला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. मुळातच अभ्यासात हुशार असलेला सुशांतने २०१९ साली एमपी एससीची पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षाही उत्तीर्ण झाला. दरम्यानच्या काळात कोरोना आल्याने भरती थांबली आणि त्याला आपली शारीरिक वाढ करण्यासाठी वेळ मिळाला. नाशिकच्या पोलीस अॅकॅडमीत गुडघ्याची दुखापत सहन करुन, त्याने खडतर ट्रेनिंग पुर्ण केली असून त्याची आता नागपूर इथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

    काही दिवसांपूर्वीच त्याचा दीक्षांत समारंभही पार पडला. सुशांत हा त्याच्या गावातील पहिला एम.पी.एस.सी पास झालेला मुलगा असल्याने गावात त्याचे कौतुक ही होत असून जोतीबाच्या डोंगरावरच्या गरीब पुजारी कुटुंबातला पोरगा ते पत्रकार ते अधिकारी हा प्रवास अनेक जणांना प्रेरणा देणारा आहे.

    ठाण्यात डान्सबारमध्ये धक्कादायक प्रकार, नोकराचा बारबालेवर जडला जीव; खुश करण्यासाठी असं केलं की…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed