• Mon. Nov 18th, 2024

    Jalna नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, राज्य सरकारची अधिसूचना जारी

    Jalna नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, राज्य सरकारची अधिसूचना जारी

    अनंत साळी, जालना : जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रुपांतर करण्याबाबत तसेच जालना नगरपरिषदेचे संपूर्ण स्थानिक क्षेत्र नगरपरिषद क्षेत्र म्हणून असल्याचे बंद करण्याबाबतच्या अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात आज एकत्रित प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव विद्या हंपय्या यांनी दिले आहेत. यानंतर जालना ही मराठवाड्यातील ५वी आणि राज्यातील २९वी महापालिका बनली आहे.
    शेतीसाठी पाठबळ दिलं, श्रमदान केलं, कलेक्टर असावा तर असा… निरोप देताना जालनाकर गहिवरले
    जालना नगरपरिषदेचं महानगरपालिकेत रुपांतर करण्यात आल्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली. नगरविकास विभागाच्या उपसचिव विद्या हंपय्या यांनी यासंदर्भातील अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आलं आहे.

    महाराष्ट्रात येणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणं, हाच मविआचा धंदा; दानवेंचं टीकास्त्र

    जालना नगरपरिषदेचे संपूर्ण स्थानिक क्षेत्र नगरपरिषदेचे क्षेत्र म्हणून बंद करण्याबाबतच्या अंतिम अधिसूचना ७ ऑगस्टला एकत्रित प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असंही या अधिसूचनेत सांगण्यात आलं आहे. जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनीही जालना नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्याचं म्हंटलं आहे. जालना नगरपरिषदेचं महापालिकेत रुपांतर करायचं की नाही याबाबत अधिसूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने जालना नगरपरिषदेचं रुपांतर महानगरपालिकेत केलं आहे.
    शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! मोसंबीच्या लागवडीत घसरण; नंतर ३ एकरात लावले खजूर अन्…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed