• Sat. Sep 21st, 2024
किशोर पाटीलांची पत्रकाराला अश्लील शिवीगाळ; एकनाथ खडसे भडकले, म्हणाले- …हे मोठं दु:ख

जळगाव: त्या ऑडिओ क्लिपवरून आमदार किशोर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे. पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ ही दुर्दैवी आणि चुकीची घटना असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची स्थानिक पत्रकाराला अश्लील शिवीगाळ केल्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटलांच्या भेटीनंतर ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले ‘आमचं ठरलंय…!’
एकनाथ खडसे यांनी आज भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील पीडित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते. या घटनेचा निषेध व्यक्त करता आला असता किंवा अन्य शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करता आली असती, मात्र पत्रकाराला अशा पद्धतीच्या शिव्या आणि धमक्या देणं हे आमदार पदाला शोभेस नाही. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपण त्याची प्रतिष्ठा आणि जपणूक आपण केली पाहिजे. अश्लील शिवीगाळ केल्यानंतरही त्या गोष्टीचा गर्व असल्याचा आमदार किशोर पाटील यांनी सांगितलं याचं मोठं दुःख आहे. आमदार किशोर पाटील यांनी दिलगिरी ही व्यक्त केलीच पाहिजे, या शब्दात एकनाथ खडसेंनी आमदार किशोर पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत.

आमचं ठरलंय, मागे हटायचं नाही लढायचं; जयंत पाटलांच्या चर्चा, आव्हाडांचं ट्वीट

दरम्यान मी पत्रकाराच्या विरोधात नाही, तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी दिले आहे. संपूर्ण देशाच्या आणि राज्याच्या पत्रकारांना अंगावर घ्यायला मी काही मूर्ख नाही. तो जर खरा असेल तर त्याने गोंडगाव गावात येऊन दाखवावं त्याने केलेल्या बातमीवर या गावातील नागरिकांच्या प्रचंड संतप्त प्रतिक्रिया आहेत. ज्या पद्धतीच्या आचारसंहिता ही लोकप्रतिनिधींना तुम्ही शिकवता त्याच पद्धतीच्या आचारसंहिता तुम्ही पत्रकारांनाही शिकवा. अशा नालायक लोकांच्या प्रवृत्ती विरोधात मी आजही आहे उद्याही आहे आणि परवाही राहील. जे होईल त्याची मला परवा नाही, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed