• Sat. Sep 21st, 2024

Pune News: जुन्नरमध्ये जोरदार राडा; रस्त्याच्या भूमिपूजनाच्या आजी-माजी आमदारांचे समर्थक भिडले

Pune News: जुन्नरमध्ये जोरदार राडा; रस्त्याच्या भूमिपूजनाच्या आजी-माजी आमदारांचे समर्थक भिडले

जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून आजी आणि माजी आमदार समर्थकएकमेकांना भिडल्याचे पहायला मिळाले. आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी घेतल्या. मात्र या श्रेयवादाच्या राजकारणात गावकरी मात्र तुमच्या राजकारण आमचा दोष काय? आमचा रस्ता कोण करून देणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

प्लॅनिंगशिवाय भटकंती ठरतेय धोकादायक; ट्रेकिंगला जाण्याआधीच ‘या’ ८ गोष्टी तपासून घ्या…

जुन्नरच्या बेल्हे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून चांगलेच राजकारण पहायला मिळाले. यावरून अतुल बेलके आणि शरद सोनवणे यांच्यातील वाद पुन्हा समोर आल्याचे पहायला मिळाले. शरद सोनवणे यांनी घटनास्थळी येत अतुल बेनके यांच्यावर टीका करत म्हणाले की, अतुल बेनके यांनी गेल्या चार वर्षात जुन्नर तालुक्यात एकही विकास कामे केली नाहीत. बेनके यांनी फक्त खोटे श्रेय घेण्याचे काम केले. बेनके यांच्या अशा वागण्याने शिवजन्म भूमीत त्यांची लाज गेली असून कोणतीही विकास कामे त्यांनी केलेली नाहीत. मी विद्यमान आमदार असताना बेल्हे गावावरुन थेट जेजुरी असा तो रस्ता मंजूर केला होता. अष्टविनायकचे रस्ते देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मंजुरी दिली होती. त्यासाठी त्यांनी स्पेशल निधी दिला असल्याचे सोनवणे म्हणाले.

Pune News : जुन्नर तालुक्यात दरोडेखोरांनी केली चार जणांना मारहाण ; दागिन्यांसह सहा लाखांचा ऐवज लंपास

यावर आमदार अतुल बेनके यांनी प्रतिक्रिया दिली असून शरद सोनवणे यांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले आहे. तालुक्यातील काही लोकांनी दोन वर्ष रस्ता रखडवला होता. मी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन रस्त्याची नव्याने मंजुरी आणली आणि रस्त्याचे काम सुरू करायला गेलो होतो. मात्र मागच्या वेळी ज्या.लोकांनी रस्ता रखडवला होता आता तीच लोक पुढे आली आहेत. भूमिपूजन झालं की कामाला सुरुवात होणार.असल्याने माजी आमदारांच्यापोटात दुखू लागले आहे, त्यातूनच त्यांनी असे कृत्य केले असल्याचा टोला बेनके यांनी लगावला.जुन्नरच्या भूमीला हे शोभत नसून माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की, विकासकामांना खोडा न घालता पुढे जाण्याची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे बेनके म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed