• Sat. Sep 21st, 2024

वनविभागाच्या परीक्षेत पास करून नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, शिक्षण क्षेत्रात खळबळ

वनविभागाच्या परीक्षेत पास करून नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, शिक्षण क्षेत्रात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : वनविभागाच्या परीक्षेत परीक्षार्थी असलेल्या विद्यार्थ्यांकडून तब्बल १० लाख घेऊन परीक्षेत पास करून नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा सिडको एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील एका अकॅडमी संचालकासह तिघांना बेड्या ठोकल्या आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास करण्यात आली. यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सावधान! पैशाचा लालच कराल तर फसाल; संभाजीनगरात हॉटेलचालकाला भामट्यांनी ४० लाखांना गंडवलं
या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. अमोल धनराज निचड (वय ३० रा. खंदाळा, ता. आकोट जि. अकोला), संत बाळुमामा ऍकडमी संचालक आण्णाजी धनाजी काकडे (वय ३० रा. मुक्काम पिंपळवाडी, पोस्ट वडुज, ता. खटाव, जि.सातारा), अनिल भरत कांबळे (राहणार जिल्हा सातारा), संदिप भुतेकर (राहणार छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अट्टल गुन्हेगाराचे मुलींना पाहून अश्लिल हावभाव; पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या
दरम्यान, वनरक्षक पदाच्या परीक्षेत पास करण्याची हमी देऊन परीक्षार्थ्यींकडून १० लाख रुपये घेतले. वनरक्षक परीक्षेत पास करून देणाऱ्या टोळीची कुणकुण एमआयडीसी सिडको पोलिसांना लागली होती. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता एपीआय कॉर्नरकडून सिडको बसस्थानकाकडे जाणाऱ्या सर्विसरोडवर छापा टाकला. यावेळीरॅकेटमधील आरोपी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेत होते. याच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना वनरक्षक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष देण्यात आले होते.

शेतकरी बाप, लेकरांची कमाल; मोठी बहीण पोलीस, भावानंही निश्चय केला, थेट PSI होऊन सॅल्यूट ठोकला

अटक करण्यात आलेल्या आरोपींची झडती घेतली असता योगेश चांगदेव सांबरे, प्रविण बाळासाहेब घुले, विक्रम किसन भांडगे, दिवटे सर्वांच १० वी, मार्कशिट १२ वीचे मार्कशिट व जेके बँकेचा सही केलेला चेक, संदिप भुतेकर याच्या नावाने ५ लाखांचा चेक, अमोल धनराज निचड याच्या नावाने ५ लाख रुपयांचा चेक, संजय देविदास विटकर, गणेश संतोष मांडे, अमोल धनराज निचड, याचे नाव असलेला आणि दुसरा ५ लाखाचा चेक आण्णाजी धनाजी काकडे याचे नावे होता. तर विवो कंपनीचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाइल, ६० हजारांचे दोन आयफोन, तर ६ लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची चारचाकी, असा ७ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार देविदास नामदेव काळे यांच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत हे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed