• Sat. Sep 21st, 2024

ऊसतोड कामगाराची लेक दीपाली राजगे बनली अधिकारी, आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं

ऊसतोड कामगाराची लेक दीपाली राजगे बनली अधिकारी, आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं

सातारा : दुष्काळी माण तालुक्यातील शेवरी येथील ऊसतोड कामगाराची व कष्टकरी मेंढपाळाची मुलगी दीपाली शिवाजी राजगे यांची नगररचना सहायक अधिकारी वर्ग -२ पदावर निवड झाली आहे. परीक्षेत ती एनटीसी प्रवर्गातून राज्यात पहिली आली आहे. यशाचे श्रेय तिने आपल्या कष्टकरी आई-वडिलांना दिले आहे. हे यश मिळवून तिने आई-वडिलांचे व कुटुंबाचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

कायम दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्यात आर्थिक संकटाचा सामना करत दीपालीने पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवरी घेतले. आठवी ते दहावीचे शिक्षण प. म. शिंदे कन्या शाळा दहिवडी, तर अकरावी बारावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज दहिवडी येथून विज्ञान शाखेतून पूर्ण केले. त्यानंतर पदवीचे शिक्षण तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी वारणानगर (कोल्हापूर ) येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या नगररचना व मूल्यनिर्धान विभागातून रचना सहायक गट ब पदी राज्यातून खुल्या गटातून दहावा क्रमांक व धनगर समाजातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
‘तरुणांनो पश्चातापाची वेळ येऊ नये’, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ग्रामपंचायतीच्या त्या पत्राची जोरदार चर्चा
दीपाली हिने आयुष्यभर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या कष्टकरी आई- वडिल व कुटुंबाचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या यशाबद्दल दीपाली राजगे हिचे माण तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी व शेवरी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे संचालक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
अधिवेशनाचं सूप वाजलं, सकाळी ८ वाजताच्या ठोक्याला दादा मंत्रालयात, खोळंबलेली कामे निकाली
स्पर्धा परीक्षा देताना सातत्याने कष्ट घेणे महत्वाचे आहे. यश हे तुमचेच आहे. तरुणांनी स्पर्धा परीक्षाकडे वळले पाहिजे. तुमच्यासाठी ही करिअरची खूप मोठी संधी आहे. माझ्या या खडतर प्रवासात दीपस्तंभासारखे पाठीशी असणारे माझे आई- वडील, भाऊ, मित्र, गुरू नातेवाईक यांचा खूप मोलाचा वाटा आहे, असे दीपाली राजगे हिने सांगितले.

मोठी बातमी : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा, कोव्हिड सेंटर घोटाळ्याचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed