वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी या गावातील हेमंत मठकर हे गेले चार पिढ्यांपासून गणेश मूर्ती बनवत आहेत. या शाळेमध्ये विविध प्रकारचे गणपती बनवले जातात. आणि गेले वर्षभर हे गणेश मुर्ती व विविध मुर्त्या या गणेश शाळेतून बनवल्या जात असतात. गेले तीन वर्षापासून हेमंत मटकर हे इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवत आहेत त्यामध्ये ,पेपर लगदा, शाडूची माती, चिकन माती, गोमेय, अशा विविध मातीच्या माध्यमातून गणेश मुर्त्या बनवत असतात. दरम्यानच्या काळात हेमंत मठकर हे बाहेरच्या राज्यात गेले होते. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी अनेक महिला गणेश मुर्त्या बनवताना दिसून आल्या. मठकर यांना आपल्या गावातील असलेल्या महिलांबाबत आदरभाव निर्माण झाला. गावात बसून गप्पागोष्टी मारणाऱ्या महिलांना मठकर यांनी हाताला काम मिळून दिलं.
प्रामुख्याने त्या महिलांना मठकर यांनी तीन महिने गणेश मुर्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. तीन महिने ट्रेनिंग देत असताना त्या महिलांना प्रत्येक दिवशी शंभर रुपये प्रमाणे मानधन देखील देत होते. तीन महिन्यांमध्ये या महिला उत्कृष्ट अशा गणेश मूर्ती बनवायला लागल्या. कोकणातील गणेशमूर्ती शाळेमध्ये सर्वच ठिकाणी पुरुषवर्ग मुर्त्या घडवताना पाहायला मिळतात. पण मात्र छोट्याशा ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनी गणेश मूर्तींचे ट्रेनिंग दिल्यानंतर आता स्वतः गणेश मूर्ती बनवत आहेत. कोविडच्या काळापासून आम्ही गणेश मूर्ती बनवायला शिकलो. तत्पूर्वी मठकर काकांनी आम्हाला तीन महिने गणेश मूर्ती बनविण्याच ट्रेनिंग दिलं. त्यामुळे आम्ही छोट्या मोठ्या गणेश मूर्ती बनवायला लागलो.
शाडू माती, चिकन माती, पेपर लगदा, गोमेय, अशा विविध मातीच्या माध्यमातून इको फ्रेंडली मुर्ती बनवायला शिकले. तसेच गणेश मूर्ती रंगविण्याचं काम सुद्धा महिला करत आहेत. या गणेश मूर्तींना पुणे, मुंबई, गोवा, बेंगलोर या भागातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या वर्षभरामध्ये जवळपास ६०० गणेश मूर्ती बनवल्या असून स्थानिकांसाठी १०० गणेश मूर्ती बनवल्या आहेत. गणेश मुर्त्या बनवणाऱ्या या ग्रामीण भागातील महिलांचे सर्वत्र पातळीवर कौतुक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यामुळे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी महिला कुठेही कमी नाही याचं हे उदाहरण आहे.