पोलिसांनी दिलेल्याल माहितीनुसार, श्रीनाथ शेडगे (वय २५. रा। मूळ वेळापूर अकलूज)असं या आरोपीचं नाव आहे. घरातली परिस्थिती हालाक्याची आणि अंगावर डोंगरा येवड कर्ज असल्याने, आरोपी श्रीनाथ शेडगे यांनी पुण्यात येऊन डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलं. दिवस रात्र काम करून हा कर्जाचा डोंगर ओसरत नव्हता. त्यामुळे आरोपी श्रीनाथ शेडगे यांनी आपल्या कामाच्या स्वरूपात एका उद्योजकाचे रेखी केले.
फूड डिलिव्हरी करत असताना त्या उद्योजकाचे माहिती मिळवत त्याची गाडी कुठे पार्क असते कधी असते याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर एक दिवस युक्ती लढवत उद्योजकाच्या गाडीवर खंडणीची मागणी करणार धमकीचं लिहलेलं पत्र गाडीच्या काचेवर चिटवलं आणि तिथून पसार झाला. त्यानंतर उद्योजकाला खंडणीच्या मागणीसाठी फोन केला. या फोनच्या धमीकला घाबरत उद्योजकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु र. क्र.128/2023 भादवि कलम 387,507 गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेन्द्र चव्हाण यांनी काही एक धागे दोरे नसताना तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज तपासून तसेच गोपनीय माहितीद्वारे अनोळखी आरोपीचे नाव निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे श्रीनाथ यलाप्पा शेडगे वय 25 धंदा – मजुरी रा. मुपो उंबरे (वेळापूर) ता. अकलूज जि. सोलापूर येथे त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती मिळाली.
सदरची बातमी हि गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी वपोनि नंदकुमार बिडवई यांना कळवली असता त्यानी युनिट 2 कडील पो.उप.नि नितीन कांबळे पो अं अमोल सरडे,पो अं पुष्पेन्द्र चव्हाण, पोअ गजानन सोनुने यांची टीम तयार करून त्यांना तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत आदेश दिले.
याप्रमाणे नमूद टीम ही खाजगी वाहनाने उंबरे ( वेळापूर )ता. माळशिरस जिल्हा सोलापूर येथे जाऊन अकलूज पोलिसांची मदत घेऊन आरोपी श्रीनाथ यलाप्पा शेडगे यास ताब्यात घेऊन त्याने गुन्ह्यात वापरलेले वोडाफोन/आयडिया कंपनीचा सिम कार्ड क्रमांक 7350524023 ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनिट -2 पुणे शहर येथील कार्यालयामध्ये घेऊन आल्यानंतर त्यास पुन्हा विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या बाबतात पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहे.