मुंबई दि. 4 : “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या” माध्यमातून नवउद्योजक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत व संस्थांनी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.
राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी कार्यरत आहे. या सोसायटी मार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात.
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उमेदवार वैयक्तिक अथवा कमाल जणांच्या समुहामध्ये सहभागी होऊ शकणार असून उमेदवारांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी www.msins.in अथवा https://schemes.msins.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज”मध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000
श्रद्धा मेश्राम/स.सं