• Sat. Sep 21st, 2024

बीओटी प्रकल्प पालिकेकडे? सिद्धार्थ उद्यानातील प्रकल्पाच्या भागीदारांतील वाद न सुटल्याने निर्णय

बीओटी प्रकल्प पालिकेकडे? सिद्धार्थ उद्यानातील प्रकल्पाच्या भागीदारांतील वाद न सुटल्याने निर्णय

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानातील बीओटी प्रकल्पाच्या भागीदारांमधील वाद परस्पर समन्वयाने न मिटल्यास तो प्रकल्प ताब्यात घेण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. वादामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.

महापालिकेने २००६मध्ये महापालिकेच्या मालकीच्या काही जागांवर बीओटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यापैकी एक सिध्दार्थ उद्यानातील आहे. उद्यानाच्या दर्शनीभागात व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाचे काम बरीच वर्षे रखडले, त्यावरुन पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरले होते. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर या प्रकल्पाच्या भागीदारांमधील वादामुळे गाळ्यांचे वाटप होत नसल्याचे लक्षात आले. याची अधिक महिती घेण्यासाठी पालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी काही दिवसांपूर्वी सर्वच्या सर्व दहा बीओटी प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला, त्यात सिद्धा उद्यानातील प्रकल्पाचादेखील आढावा घेण्यात आला. या बद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भागीदारांमधील वादामुळे बीओटी प्रकल्पातील गाळेवाटप थांबले आहे, त्याचा परिणाम म्हणून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. करारानुसार महापालिकेचा हिस्सा महापालिकेला मिळणे गरजेचे आहे, त्याशिवाय संपूर्ण मालमत्तेला मालमत्ता कर लावणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधितांनी वाद मिटवावा असे निर्देश जी. श्रीकांत यांनी विकासकांना दिले. वाद न मिटल्यास उद्यानाचा बीओटी प्रकल्प जागा ताब्यात घेण्याची कावाई महापालिका करेल, असे कळविण्यात आले. बीओटीच्या काही प्रकल्पांमध्ये अडचणी आहेत, या अडचणी दूर करण्याचे आदेशदेखील प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिले.
घरांच्या जाहिरातींबाबत महारेराने घेतलेला निर्णय उद्यापासून लागू; संकेतस्थळाशेजारी आता QR कोडही
असा आहे वाद

सुमारे सात हजार चौरस मिटर जागेवर व्यापारी संकुल व पार्किंग उभारण्यासाठी महापालिकेने २००६ मध्ये प्रकाश डेव्हलपर आणि जेव्ही यांना विकसित करण्यासाठी दिली. २००८ मध्ये हे काम संबंधित दोघांनी अथर्व ॲण्ड सुनील डेव्हलपरला दिले. त्यावेळी भागीदारी व नफ्यासंदर्भात करार करण्यात आला. पुढे महापालिकेच्या हिश्शाची ७० हजार चौरस फुटाची पार्किंगची जागा व काही बांधकाम करण्यात आले. त्यानंतर २० टक्के भागीदार असलेल्या अन्य एका विकासकाने पुढील काम करण्याची जबाबदारी घेतली. हे काम करताना त्यांनी अथर्व ॲण्ड सुनील डेव्हलपरच्या इतर भागीदारांना अंधारात ठेवल्याचा आरोप होत आहे. याठिकाणी ८० गाळे असून, यातील काही गाळे विक्री करण्यात आले आहेत, तर उर्वरित गाळे विक्रीस महापालिकेने स्थगिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed