• Mon. Nov 25th, 2024

    मुलीच्या किडन्या फेल, बापाने स्वतःची किडनी दिली पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं…

    मुलीच्या किडन्या फेल, बापाने स्वतःची किडनी दिली पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं…

    पुणे : नियती कुणाशी कसा खेळ खेळेल याची काही शाश्वती देता येत नाही, हसता खेळता माणूस क्षणात आपल्यातून निघून जातो. अशीच एक घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरातून समोर आली आहे. दोन वर्षापूर्वी मुलीची किडनी खराब होण्याच्या मार्गावर होती. म्हणून वडिलांनी मुलीला पिंपरी चिंचवड येथील जुपिटर रुग्णालयात दाखल केले. आठ महिने डायलेसिस केल्यानंतर मुलीच्या यातना बापाला पाहवल्या नाहीत म्हणून बापाने स्वतःची किडनी आपल्याला मुलीला दिली. ती किडनी तिला बसावल्यानंतर तिने सहा महिने चांगला प्रतिसाद दिला. मात्र कोरोनानंतर म्युकरमायकोसिस आजाराचे तिला इन्फेक्शन झाले आणि तिने अवघ्या ३८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. क्षणात कुटुंबातून ती निघून गेल्याने वडिलांना मोठा हादरा बसला.

    मित्राचं अपघाती निधन, आता मुलीचीही अचानक एक्झिट, उदयनराजे हळहळले, पोस्ट करुन म्हणाले…

    आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव मूळचे असणारे भरत बांगर यांचे कुटुंब. ते सध्या मंचर येथे राहायला होते. स्नेहा बांगर हीचे शिक्षण एम एससी बायोटेक मध्ये झालेले होते. तसेच ती मुंबई येथे एका कंपनीत कामाला देखील होती. मात्र, अचानक ती आजारी पडली. बीपी वाढू लागल्याने तिचे चेक अप केले मग तिच्या किडनी निकामी होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तेव्हा घराच्या लोकांनी तिला पिंपरी चिंचवड येथील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू केले. काही दिवसांनी तिचे डायलेसिस सुरू झाले. मात्र शरीर साथ देत नसल्याने तिच्या किडन्या निकामी होऊ लागल्या होत्या. मात्र, लेकीच्या या यातना बापाला बघवल्या नाहीत. बापाने स्वतःची किडनी मुलीला दिली आणि तिला जगवण्याचा प्रयत्न केला.

    असं दु:ख कोणाच्या वाट्याला येऊ नये; पोलीस बाप म्हणाला, माझा सन्मान बघायला लेक नाही, ती असती तर…

    किडनी बसावल्यानंतर तिने उपचारांना प्रतिसाद दिला. तिला कुठलेही इन्फेक्शन होऊ नये म्हणून तिला आरामासाठी मोशी येथे नातेवाइकांकडे ठेवले. मात्र सहा महिन्यानंतर तिला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की तिला म्युकरमायकोसीस रोगाचे इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे तिचे प्रत्येक आठवड्याला शरीरातील एक भाग निकामी झाल्याने काढावा लागत होता. मात्र, या ऑपरेशनमुळे तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. अखेर तिच्या शरीराने तिची साथ सोडली आणि तिने मंगळवारी पहाटेच्या सुमारास जगाचा निरोप घेतला. तिच्या या आजाराची तिला कल्पना आली असावी. त्यामुळे तिने लग्न न करण्याचा देखील निर्णय घेतला होता. बापाने तिच्या उपचारासाठी ६० लाख रुपये खर्च तर केलाच पण तिला जगवण्यासाठी स्वतःची किडनी देखील काढून दिली. मात्र नियतीचा तीच जगणं मान्य नसावे आणि ती जगातून निघून गेली. या घटनेने संपूर्ण आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed