• Mon. Nov 25th, 2024
    शरद पवारांच्या भाषणातील एका गोष्टीवर रोहित पवारांना वाटते खंत; टिळक पुरस्कार सोहळ्यात झालं तरी काय?

    मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल १ ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम अनेक अर्थाने चर्चेत राहिला त्यापैकी एक म्हणजे या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती होय. मोदी आणि पवारांची भेट, शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर असून संवाद तर दूरच पण साधी नजरानजरही झाली नाही. या सर्व घटनेनंतर आता रोहित पवार यांची एक मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

    पुरस्कार सोहळ्यादरम्यान नरेंद्र मोदी व्यासपीठावर येताच शरद पवार आणि त्यांची भेट झाली. पवारांनी मोदींच्या खांद्यावर थाप मारली. पण कार्यक्रम झाल्यानंतर व्यासपीठावरून जाताना अजित पवार हे शरद पवारांच्या मागच्या बाजूने बाहेर पडले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर काका-पुतण्या प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. मात्र दोघांमध्ये नजरानजरही झाली नाही.

    या घटनेबद्दल रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ही घटना का घडली याचे उत्तर मला तरी देता येणार नाही. ते अजित पवारच सांगू शकतील. पण त्या व्यासपीठावर अन्य नेते देखील होते. त्यात सुशीलकुमार शिंदे देखील होते. ते काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. पुण्यातील त्या कार्यक्रमाचे व्यासपीठ बघत असताना अनेकांना पूर्वीचे राजकारण कसे होते हे आठवले. एखादा सामाजिक विषय असेल, तर राजकारण बाजूला ठेवून एकत्र कसे यायचे हे त्या व्यासपीठाने दाखवून दिले.

    वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; CSMT-शिर्डी, सोलापूर गाड्या आता या स्थानकांवर थांबणार
    हा कार्यक्रम होण्याआधी अनेकांना असा प्रश्न पडला होता की शरद पवार त्या व्यासपीठावर का चालले आहेत. पण मला असे वाटते की, पवारांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आजच्या राज्यकर्त्यांना एक संदेश द्यायचा होता की, तुम्ही आज जे राजकारण करत आहात. जे द्वेषाचे राजकारण करत आहात, जे भेदभावाचे राजकारण करत आहात ते आजचे राजकारण आहे. मात्र पूर्वीचे राजकारण हे असे होते, हेच पवारांनी दाखवून दिले, असे रोहित पवार म्हणाले.

    इतक नाही तर रोहित पवार पुढे असे ही म्हणाले, जर तुम्ही शरद पवारांचे भाषण ऐकले तर त्यांनी अनेकांना विविध पद्धतीने संदेश दिला आहे. त्यामध्ये राज्यकर्त्यांना, पत्रकारांचा समावेश होता. राज्यकर्त्यांनी पत्रकारांवर दबाव आणू नये, सामाजिक काम कसे असावे हे देखील पवारांनी सांगितले. पण हे सर्व सांगत असताना मला असे वाटले होते की, शरद पवार हे लोकमान्य टिळकांच्या ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ या अग्रलेखाचा उल्लेख करतील. पण तसे तो काही झाला नाही. वेळेची मर्यादा होती. शरद पवार फक्त सहा मिनिटे बोलले, असे रोहित पवार म्हणाले.

    शरद पवारांनी आजच्या राजकीय परिस्थितीत सामान्य जनतेला अडचणी सोसाव्या लागतात, भेदभावाचे राजकारण केले जाते हे सांगतले. पवारांनी कदाचीत त्या व्यासपीठाचा मान राखण्यासाठी टिळकांच्या अग्रलेखाचा उल्लेख केला नसावा असे मला वाटते, असे रोहित पवार म्हणाले. पण पवारांनी तो उल्लेख केला नसल्याची खंत वाटल्याचे रोहित पवारांच्या बोलण्यातून दिसून आली.

    नरेंद्र मोदी व्यासपीठावरील मान्यवरांना भेटले; जाताना थाप दिली, अजित पवार हसले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed