• Sat. Sep 21st, 2024
मटनापेक्षाही महाग मशरूम…! बाजारपेठेत ‘जंगली मशरूम’ची चर्चा, जाणून घ्या काय आहे स्पेशालिटी?

गडचिरोली: सध्या गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील बाजारपेठेत विक्रीसाठी जंगली मशरूम आले आहे. या जंगली मशरूमला मोठी मागणी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रति किलो मशरूमसाठी ८०० ते १००० रुपयांचा दर मिळत आहे. मटनापेक्षाही महाग दराने मशरूमची विक्री होत आहे. दरम्यान, मशरूमची खरेदी करण्यासाठी सध्या नागरिक देखील गर्दी करत आहेत. त्यामुळे या मशरूमच्या विक्रीतून लोक चांगल्या प्रकारची कमाई करत आहेत.
महाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी सापडला कातळशिल्पांचा खजिना, ‘क्रॉस’च्या आकाराची चित्रकृती निदर्शनास
जुलै, ऑगस्ट महिन्यात मशरूमला मोठी मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे अहेरी उपविभागातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या आलापल्ली शहरात खेड्यापाड्यातील नागरिक ८०० ते १००० रुपये दराने मशरूम विकत आहेत. मागील वर्षी पेक्षा यंदा कमी प्रमाणात मशरूम आढळत असल्याने मशरूमचे दर गगनाला भिडल्याचे बोलले जात आहे. आलापल्ली शहरात ७०० रुपये किलो मटण विकले जाते. तर मशरूम हे ८०० ते १००० रुपये दराने घ्यावे लागत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. केवळ याच मोसमात जंगली मशरूम मिळत असल्याने नागरिक सुद्धा मशरूम घेण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे, वणवण भटकून मशरूम गोळा करणाऱ्या खेड्यापाड्यातील लोकांना शहरात मशरूमला चांगले भाव मिळत आहे हे विशेष. पावसाची हजेरी लागताच गडचिरोली जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत जंगली मशरूम विक्रीसाठी आले आहे. सध्या या जंगली मशरूमला बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे दिसत आहे. सोबतच चांगला दर देखील मिळत असून ८०० ते १००० रुपये प्रति किलोला दर मिळत आहे. सध्या बाजारात मशरूमची खरेदी करण्यासाठी मशरूम खवय्ये गर्दी करत आहेत. नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगले आहेत. या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागताच जंगलीव्याप्त भागात नैसर्गिक पद्धतीनं हे मशरूम स्वतः उगवते. याची कुठेही लागवड केली जात नाही.

झाड आहे की नळ? ताडोबात चक्क झाडातून पाण्याची धार; काय आहे व्हिडिओमागचं सत्य?

नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर जंगलात हे मशरूम उगवते. गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम खोदून आणतात. त्यानंतर मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून त्याला विक्रीसाठी बाजारात घेऊन जातात. मशरूम हे आरोग्याला पोषक असल्याने डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देतात अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, एटापल्ली, मुलचेरा,अहेरी, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील जंगलात हे मशरूम पाहायला मिळते. विशेषत: बांबू जंगलात याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. पावसाळा सुरू झाला की, मशरूम मोठ्या प्रमाणात उगवते. तसेच बाजारपेठेत देखील त्याला या काळात जास्त मागणी असते. श्रावण महिन्यात नागरिक मांसाहारी पदार्थ टाळतात. त्यामुळे या काळात मशरूमला मोठी मागणी असते. शरीरासाठी देखील मशरूम पोषक असते. आयुर्वेदात देखील मशरुमचे मोठे महत्व आहे. त्यामुळेच बाजारात मशरूमला मोठी मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed