• Sat. Sep 21st, 2024

अचानक बिबट्या घरात शिरला, महिलांची भंभेरी उडाली, जीव मुठीत घेऊन सर्वांनी केली स्वतःची सुटका

अचानक बिबट्या घरात शिरला, महिलांची भंभेरी उडाली, जीव मुठीत घेऊन सर्वांनी केली स्वतःची सुटका

मंचर, पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बिबट्याच्या वावराने दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आंबेगाव तालुक्यातील पाटण परिसरात रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात अचानक बिबट्या शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. बिबट्या ज्यावेळी घरात शिरला त्यावेळी घरात फक्त महिलाच होत्या. मात्र महिलांनी अत्यंत सावधानतेने बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. आज सकाळी १० वाजता ही घटना घडली. जीव वाचल्याने महिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
विहिरीचं काम सुरु होतं, मुरूम खाली ढासळला, ४ कामगार गाडले गेले, इंदापुरातील हृदयद्रावक घटना
आदिवासी भागात असणाऱ्या पाटण गावच्या हद्दीत बिबट्या सकाळी मुसळे यांच्या घरात शिरला. बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने घरात अडचणीच्या जागेत जाऊन बसला होता. बिबट्या पावसात भिजला असल्याने तो आजारी असल्याचे त्याच्या सडलेल्या शेपटीवरून दिसून येत होते. याबाबत घरातील व्यक्तींना समजल्यानंतर त्यांची एकच तारांबळ उडाली. त्यांनी कुठलाही आवाज न करता बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.
Mumbai Pune Express Way: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे बाबत मोठी अपडेट, खंडाळा बोगद्यात कंटेनर पलटी, वाहतूक वळवली
घरात बिबट्या शिरल्याने आदिवासी भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या परिसरात मोबाइल फोन लागत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. बिबट्या जखमी व आजारी असल्यामुळे त्याला घरातून काढणे अवघड झाले होते. पंरतु वन विभागाच्या रेसक्यु टीममुळे व स्थानिकांच्या सहकार्याने त्याला जेरबंद करण्यात यश आले. बिबट्या आजारी असल्याने त्याच्यावर माणिकडोह बिबट निवारण केंद्रात उपचार करण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे यांनी सांगितले.

इंदापुरात विहिरीचं बांधकाम सुरु असताना दुर्घटना, मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

बिबट्या घरात शिरल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर वन विभागाने शर्थीच्या प्रयत्न केले. आणि बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात यश आले. या परिसरात भातशेती लागवडीची कामे सुरू आहेत. यामुळे घरात फार माणसे नसतात. मात्र बिबट्यांचा असाच वावर वाढू लागल्यास परिस्थिती अवघड होईल, असे या भागातील नागरीकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed