• Thu. Mar 12th, 2026

    तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत, होमहवनाने अडचणी सोडवितो सांगत भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार

    तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत, होमहवनाने अडचणी सोडवितो सांगत भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार

    अहमदनगर : तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत. त्या मी होमहवन करून सोडवितो असे सांगत एका भोंदूबाबाने शेतमजूर महिलेवर अत्याचार केला. त्याला पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात ही घटना घडली. शिवाजी पांडे (रा. शिरापूर, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

    संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात एक शेतमजुराचे कुटुंब राहत आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्या कुटुंबात अडचणी येत आहे. त्यामुळे एका नातेवाईकाने त्यांची पांडे या भोंदूबाबाशी ओळख करून दिली. घरगुती अडचणी सोडविण्यासाठी हा पांडे त्यांच्या घरी येऊन मंत्रतत्र उपचार करतो. त्यामुळे त्याची कुटुंबाशी ओळख झाली आहे.

    संभाजी भिडे यांचे सांगलीत जोरदार स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, महिलांकडून औक्षण
    याच ओळखीचा फायदा घेत पांडे या मजुराच्या घरी आला. तेव्हा घरात महिला एकटची होती. बाकीचे शेतावर कामाला गेले होते. याचा गैरफायदा पांडे यांने उचलला. घरात एकटी असलेल्या महिलेच्या अंगावर उदीसदृष्य पदार्थ टाकून आपण उपचार करीत असल्याचे सांगत तिच्यावर अत्याचार केला.

    Netflix मध्ये आहे जबरदस्त नोकरी, या कामासाठी मिळणार ७.४ कोटी रुपये इतका पगार
    त्यानंतर पांडे पळून गेला. त्यानंतर महिलेने पतीच्या मदतीने आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी पांडे याच्याविरूद्ध अत्याचार केल्याचा तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समुळ उच्चाटन करणे अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल केला, आश्वीचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी आरोपीला पकडण्यासाठी तातडीने पथके रवना केली.

    तर मुलींची शाळा बंद करून धुणीभांडी करायला पाठवू, उंबरे ग्रामस्थांची भूमिका, मुंबईतील आमदाराला पत्र
    हवालदार बाबासाहेब पाटोळे, पोलीस नाईक विनोद गभिंरे, ढोकणे, पथवे व वाघ यांच्या पथकाने शिरापूर येथे पहाटे ३ वाजता सापळा रचून आरोपी पांडे याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला ४ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed