पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार,प्रभू आनंद अहिरे ( ६१ ) आणि त्यांची पत्नी या हल्ल्यात थोडक्यात बचावले. मनपात सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान प्रभू अहिरे हे पत्नीसह नुकतेच हनुमान नगर येथे राहण्यास आले आहेत. सर्वजण घरी असताना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पत्नी घरात स्वयंपाकाची तयारी करत करत होते. यावेळी घराचा दरवाजा उघडाच होता. यावेळी अचानक चेहऱ्यास रुमाल बांधलेल्या दोघांनी घरात प्रवेश केला.
घरात घुसलेल्या दोन तरुणांनी अहिरे दांपत्याला काही कळायच्या आता एकाने अहिरे यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. प्रभू अहिरे प्रसंगावधान राखून खाली बसले, त्यामुळे गोळी बाजूला गेली. यात त्यांचा जीव वाचला. तेवढ्यात आणखी एक गोळी धाडली त्यातूनही दाम्पत्य बचावले. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर तेथून पसार झाले. विशेष म्हणजे, हल्लेखोर चालत आले होते. गोळीबारनंतर दोघेही त्याच मार्गे पसार झाले.
दरम्यान शहरांमध्ये पुंडलिक नगर भागामध्ये दाम्पत्याच्या घरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, राजश्री आडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात दोन्ही बुलेट आढळून आल्या आहेत. गोळीबार करणारे दोघेही जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.