• Mon. Nov 25th, 2024
    धक्कादायक! केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरने संपवलं आयुष्य; रुग्णालयात खळबळ

    मुंबई: केईएम रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आळी आहे. केईएममधील निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी शिवडी येथील टीबी रुग्णालयात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर भोईवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयात दुरूस्ती सुरू असल्याने मेडिसीन विभाग टीबी रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे.
    शेतात बापलेकाने प्राण सोडले, दोघांची एकत्रच अंत्ययात्रा, अख्ख्या गावाने चूल पेटवली नाही
    मिळालेल्या माहितीनुसार, मुळचा जळगावचा आदिनाथ पाटील (२७) हा केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. तो मेडिसिन विभागात पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. आदिनाथ पाटीलने टीबी रुग्णालयात रात्रीच्या वेळेस इंजेक्शन घेत आयुष्य संपवलं आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. मात्र त्याने असं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या शोध पोलीस करत आहे.

    गावाला पुराचा वेढा, प्रकृती खालावल्यानं रुग्णांना डॉक्टरांनी ट्रॅक्टरने आणलं आरोग्य केंद्रात

    दरम्यान शिवडी रुग्णालयात सोयीसुविधा अभाव असल्याने अनेक निवासी डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे डॉक्ट नैराश्यात जाऊन अशा घटना घडत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने गांर्भीयाने लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed