• Thu. Nov 28th, 2024
    सलाम डॉक्टर! पुराच्या पाण्यातून रुग्णांना ट्रॅक्टरने आरोग्य केंद्रात नेलं, धाडसाची सर्वत्र चर्चा

    चंद्रपूर : पुराच्या पाण्यातून रुग्णांना ट्रॅक्टरने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. विशेष म्हणजे यात गर्भवती महिलांचाही समावेश आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले. चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून अद्यापही काही भागात पावसाचा जोर कायम आहे. या पुराचा फटका साहजिकच रुग्णांनाही बसला आहे. प्रकृती खालावलेल्या रुग्णांना ट्रॅक्टरने भरपुरातून आरोग्य केंद्रात आणले गेले. याबद्दल डॉक्ट विजय पडगिलवार यांना सलाम केला जात आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे जिल्हात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. तर काही गावांना पुराने वेढा दिला होता. या पुराचा वाहतूक, शेतीला मोठा फटका बसला. शेकडो घरांची पडझड झाली. या पुराचा फटका रुग्णांना बसला. वर्धा नदीला पूर आल्याने धानोरा पुलावरून पाणी वाहत होते.
    वर्गाच्या खिडकीत झोपून मोबाईलवर गप्पा, जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींचा ‘राजेशाही थाट’, VIDEO
    वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आला होता. वढा गावाला पुराने वेढले होते. बेलसनी गावात सुद्धा पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पूरस्थितीत पिपरी या गावातील तेजस्विनी हेपट, योगिता येरगुडे, वढा येथील शुभांगी गिरडकर, कुसुम गिरडकर, बेलसनी येथील उज्ज्वला भोंगळे, मयूरी चटप, कल्याणी आसुटकर, वैभवी आसुटकर यांची प्रकृती खालावली.

    चंद्रपूर शहरात ८ ते १० फूट पाण्याचा वेढा, नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात

    आरोग्य केंद्रातील आशा वर्कर, गावकरी यांच्या मदतीने त्यांना ट्रॅक्टर व रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुराच्या पाण्यातून बाहेर काढत घुग्गुस प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. या रुग्णांवर आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. घुग्गुस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पडगिलवार यांच्या धाडसाचं कौतुक होत आहे.

    प्रियजनांच्या जीवापेक्षा धर्म मोठा नाही, भिन्नधर्मीय महिलांचे एकमेकींच्या कुटुंबीयांना किडनीदान

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed