• Mon. Nov 25th, 2024
    बसचे वायपर पडलं बंद; चालकाचे साहसी कृत्य, एका हाताने काच पुसत…

    नांदेड: राज्यातील एसटी महामंडळाच्या भंगार आणि नादुरुस्त बसेसचा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. चार दिवसांपूर्वी धावत्या बसचे छत उखडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही बाब चर्चेत असताना बसचा वायपर काम करत नसल्याने एका बस चालकाला धावत्या बस दरम्यान एका हाताने काच पुसावी लागली. हा धक्कादायक प्रकार बसमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
    एका हाताने वायपर-एका हाताने स्टेअरिंग चालवत चालकाचा १२० किमी प्रवास, थरारक VIDEO
    मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्हातील देगलूर येथील हा प्रकार आहे. दोन दिवसांपूर्वी एसटी महामंडळाची बस देगलूर मार्गावरून ग्रामीण भागात जात होती. प्रवासादरम्यान अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस सुरु झाल्याने बसच्या काचेवर पावसाचे पाणी जमा झाले होते. त्यानंतर चालकाने वायपर सुरू केले. मात्र दोन पैकी एक वायपर काम करत नव्हतं. तेव्हा चालक बस न थांबवता धावत्या प्रवासादरम्यान एका हाताने काच पुसत होता. दुसऱ्या हाताने स्टेरिंग हाताळत होता. धोकादायक पद्धतीने चालक बस चालवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बस थांबवून ही बस चालकाने तांत्रिकबाबी दूर केली असती. मात्र बस चालक धावत्या बस दरम्यान एका हाताने बसची काच पुसत होता. बस चालकाच्या या कृत्यामुळे काही घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

    एका हाती स्टीअरींग, एका हाती वायपर… प्रवाशांचा जीवाशी खेळ

    बसचा प्रवास सुरक्षित असल्याने बहुतांश प्रवासी बसने जातात. विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने बसनेच प्रवास केला जातो. असे असतानाही बसच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र कायम महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस यांची दयनीय अशी अवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात प्रवाशांना बसमध्ये बसल्यावर हातात छत्री घ्यावी लागते, असे विदारक चित्र आहे. गळक्या बस सोबतच वायपर बंद असणे, दरवाजा खिळखिळा होणे यातून एकाचा जीव गेल्याची ही घटना कंधार तालुक्यात मागील महिन्यात घडली होती. त्यातच आता चालकाने केलेल्या या कृत्याने पुन्हा एकदा भंगार बसेसच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed