• Sat. Sep 21st, 2024

अधिकाऱ्याच्या लेकाकडून विठ्ठलाची पूजा, वारकरी आक्रमक होताच दिलगिरी, व्हिडिओ बाहेर कसा आला?

अधिकाऱ्याच्या लेकाकडून विठ्ठलाची पूजा, वारकरी आक्रमक होताच दिलगिरी, व्हिडिओ बाहेर कसा आला?

सोलापूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रोज नवनवीन वाद समोर येत असताना मंदिराचे नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मुलाचा देवाला दुधाने अभिषेक करीत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे . याच्या बातम्या माध्यमात आल्यावर कार्यकारी अधिकारी शेळके यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त केली आहे.विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेच्यावेळी कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या कडून रुक्मिणीची पूजा तर मंदिर सदस्य संभाजी शिंदे यांच्या कडून विठ्ठलाची पूजा झाली होती. यावेळी शेळके यांच्या मुलाकडून विठ्ठलाला शंखातून अभिषेक घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर वारकरी संप्रदायातून याला आक्षेप घेण्यास सुरुवात झाली होती . आम्ही २५ हजाराची पूजा करूनही आम्हाला असा अभिषेक करता येत नसताना अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून त्याला हा अधिकार मिळाला का असा आक्षेप घेण्यास सुरुवात झाली . यानंतर तातडीने मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करीत पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली आहे.

देवाच्या पूजेचा अधिकार कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला होता मग मुलाला असा अभिषेक कसा करता आला असा मुद्दा घेऊन वारकरी संप्रदायातील मंडळी आक्षेप घेऊ लागली होती. विठ्ठल भक्तांकडून अभिषेक किंवा पूजा असताना कोणत्याही भाविकाला देवाला हात लावू दिला जात नाही आणि असा अभिषेक देखील करता येत नाही. त्यामुळेच वारकरी संप्रदायाकडून या तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या .

संयमी पृथ्वीराज चव्हाण यांना भिडेंविरोधात आक्रमक होताच फोनसह मेलवरुन धमकी, साताऱ्यात खळबळ, पोलीस अ‍ॅलर्ट
यापूर्वी विठ्ठल जोशी यांनी प्रक्षाळ पूजेच्यावेळी विठ्ठलासमोर स्नान केले म्हणून त्यांचेवर देखील खूप टीका झाली होती. आता या नवीन कार्यकारी अधिकारी यांच्या लहान मुलाने केलेला अभिषेक चर्चेत आला आहे. वास्तविक राजेंद्र शेळके हे महिन्यापूर्वीच मंदिरात रुजू झाले असून त्यांना अजून मंदिराचे नियम , प्रथा परंपरा याबाबत माहिती नसली तरी मंदिराच्या इतर प्रशासकीय अधिकारी वर्गाने याबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे असताना ते न देता उलट हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कार्यकारी अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी; विदेशात जळगावच्या सुपुत्राचा डंका, सुवर्णपदकावर नाव कोरलं
प्रक्षाळ पूजेच्यावेळी शेळके यांचा दहा वर्षाचा मुलगा सोवळे नेसून आई बाबांच्यासोबत पूजेच्या ठिकाणी उपस्थित होता . पण तो रुक्मिणीकडे असताना त्याला विठ्ठलाकडून आणून त्याला कोणी अभिषेक घालायला लावला आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल कसा झाला हे प्रश्न उभे राहिले आहेत. यासर्व प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करताना शेळके यांनी या सर्व प्रकारची चौकशी करण्यात येईल असे सांगितले आहे .

महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंना सुनावले, काँग्रेसलाही सवाल

नामदेव पाटलांकडून सहा लाख २५ हजार रुपये किंमतीचा सुवर्णहार विठुरायाला भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed