• Sat. Sep 21st, 2024

जागतिक व्याघ्रदिनीच आकडा एकने कमी; चंद्रपुरात मृतावस्थेत आढळली वाघीण, मृत्यूचे कारण?

जागतिक व्याघ्रदिनीच आकडा एकने कमी; चंद्रपुरात मृतावस्थेत आढळली वाघीण, मृत्यूचे कारण?

चंद्रपूर : जागतिक व्याघ्रदिनीच एक वाघीण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. सदर घटना शनिवारी सकाळी बल्लारशाह वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कळमना नियतक्षेत्रातील सामाजिक वनीकरण रोपवाटिकालगत कुकुडरांझीचे झुडपात उघडकीस आली.

माहिती मिळताच मध्य चांदा वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, साहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, कळमनाचे क्षेत्र साहाय्यक भगीरथ पुरी घटनास्थळी दाखल झाले. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असून वय सुमारे ४ वर्ष आहे. चंद्रपूर येथील टीटीसी येथे शवविच्छेदन करण्यात आले. वाघिणीच्या मृत्युचे खरे कारण स्पष्ट झाले नसले तरी जखमी वाघीण बघता तिचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी वनगुन्हा नोंद केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

धक्कादायक! नागपुरात फ्लॅटमध्ये सापडला तरुण अभियंत्याचा मृतदेह, आईच्या निधनानंतर होता निराश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed