संतोष ज्ञानेश्वर थोरात (रा. वाघलगाव ता. फुलंब्री) माया भाई उर्फ प्रशांत सासवडे (रा. नवनाथ नगर विजय चौक गारखेडा परिसर) अशी बॅनर लावणाऱ्या ‘चमको भाईं’ची नावे आहे. दरम्यान हे बॅनर चौकात लागल्यानंतर जवाहर नगर पोलिसांना या बॅनरची माहिती मिळाली. हातात शस्त्र घेऊन बॅनर असल्यामुळे जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मानकापे यांनी फिर्याद दिली.
त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन महाराज चौकामध्ये प्रशांत सासवडे याच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये त्याचा ‘माया भाई’ असा उल्लेख करण्यात आला असून त्याच्या हातात बंदूक आहे. या बॅनरवर संतोष ज्ञानेश्वर थोरात याचा शुभेच्छुक म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. दोनही कार्यकर्ते हे सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या जवळचे कार्यकर्ते आहेत.
वाढदिवसानिमित्त विद्रुपीकरण करणारे बॅनर लावून शहराचे वातावरण खराब केल्याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यामध्ये दोन्ही कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड हे तपास करीत असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती जवाहर नगर पोलिसांनी दिली आहे.
‘इन्स्टा’वर बनावट अकाउंट करणारा अटकेत
इन्स्टाग्रामवर युवतीचे बनावट अकाउंट तयार करणाऱ्या शारेक खान नईम खान (२६, रा. आरेफ कॉलनी) यास सिटी चौक पोलिसांनी अटक केली. त्याने अनेक युवतींचे बनावट अकाउंट तयार केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याला ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. पाटील यांनी दिले. कोठडीची विनंती सहायक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी न्यायालयाकडे केली होती.