जळगाव: रेल्वे रुळ क्रॉस करताना सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा धक्का लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार २८ जुलै रोजी रात्री ७.५० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पवननगर परिसरात रेल्वेच्या डाऊन रेल्वेमार्गावर घटना घडली. सतीष पांडुरंग सोनवणे (३४) मुळ रा. चोपडा असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीष सोनवणे हे चोपडा येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. तीन दिवसांपूर्वी ते जळगाव येथे वृंदावन कॉलनीत राहत असलेल्या त्यांच्या मोठ्या भगिनी चंदाबाई महाजन यांना भेटण्यासाठी आले होते. शुक्रवारी सायंकाळी ते बाहेर जाण्यासाठी घराबाहेर पडले. जळगाव शहरातील पवननगर परिसरातील डाऊन रेल्वे रूळ (खांबा क्र. -४२१ / ३.५) ओलांडत असताना त्यांना मंगला एक्सप्रेसचा धक्का लागून सतीष बाजूला फेकले गेले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अति रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. लोको पायलट पी. पी. राणे यांनी स्टेशन प्रबंधक यांना या अपघाताची माहिती दिली. स्टेशन प्रबंधकांनी तालुका पोलिसांना खबर देऊन सदर घटना कळविली.

तालुका पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल बापु कोळी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी तसेच हेडकॉन्स्टेबल सुधाकर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली. प्रजापत नगर परिसरातील वृंदावन कॉलनीतील गणेश रमेश महाजन हे घटनास्थळी आले. मयत हा आपलाच शालक असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. अशाप्रकारे मयताची ओळख पटली. त्यानंतर तालुका पोलिसांनी मयताचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला. शनिवार २९ रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान मयत सतीश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, लहान भाऊ संदीप, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.