चंद्रपूर: नियमित पाणीकर भरलेला असतानाही ग्रामपंचायतीने नळाचा पाणीपुरवठा खंडित केला. या प्रकाराचा सरपंच, उपसरपंच यांना जाब विचारून परत येताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली. भाऊराव खोब्रागडे असे मृतकाचे नाव आहे. ग्रामपंचायतीकडून गावातील जवळपास चाळीस घरांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ग्रामपंचायतीने पाणी कर भरण्याची पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या विठ्ठलवाडा येथील ग्रामपंचायतेचा भोंगळ कारभार एका वृद्धाच्या जीवावर उठला आहे. ग्रामपंचायतीने पाणीकर थकीत असल्याच्या कारण पुढे करून गावातील चाळीस घरगुती नळाचा पाणी पुरवठा खंडित केला. याची पूर्व सूचना दिली नव्हती. गावातील भाऊराव खोब्रागडे यांनी नियमित पाणीकर भरला होता. कराची भरणा केल्यावरही नळाचा पाणी पुरवठा खंडित झाल्याने खोब्रागडे यानी सरपंच, उपसरपंचाचे घर गाठले. त्यांना जाब विचारला. घरी येताना हार्ट अटॅक आला. गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

पाणीकर भरूनही नळ कापल्याने खोब्रागडे विचलित झाले होते. त्यांच्या मृत्यूला ग्रामपंचायत जबाबदार असल्याचा आरोप पत्नी मायाबाई यांनी केला आहे. यासंदर्भात विठ्ठलवाडा ग्रामपंचायतचे सचिव कोडापे यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता ते म्हणाले, ही चूक शिपायाची आहे. नळाच्या पाणीपुरवठा खंडित करण्याचा कुठल्याच सूचना दिल्या नव्हत्या. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केलं.