• Fri. Nov 15th, 2024
    एका हाताने वायपर-एका हाताने स्टेअरिंग चालवत चालकाचा १२० किमी प्रवास, थरारक VIDEO

    गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असतांना वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पूर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचे चलचित्र विविध समाज माध्यमावर व्हायरल झाले. महामंडळाच्या बसचे छत उडत होते. मात्र एसटी पूर्ण वेगाने सुसाट धावत होती. हे चलचित्र राज्यात चर्चेत असताना एसटीचं असंच एक चलचित्र व्हायरल होत आहे.

    राज्यातील एसटी महामंडळाची बिकट अवस्था दर्शविणारं आणखी एक चलचित्र व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये चालकाच्या एका हातात स्टेअरिंग तर दुसऱ्या हाताने वायपर चालवत असताना दिसत आहे. ही अहेरी विभागाची बस असल्याचं सांगण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त सिरोंचा येथे अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी गुरुवारी मतीन अहमद शेख यांनी १२० किमीचा परतीचा प्रवास अहेरी आगारात एका हाताने स्टेअरिंग आणि दुसर्‍या हाताने वायपर चालवण्यासाठी केला.

    जवळपास २५ वर्षांहून अधिक काळ एसटीची सेवा केलेल्या शेख यांनी सांगितले, अहेरीहून प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा वायपर काम करत होता, मात्र परत येत असताना अचानक बसचे वायपर काम करत नव्हते. मी माझ्या तांत्रिक टीमला कळवले. वायपर दुरुस्त करेपर्यंत वाट पाहिली. पण मी प्रवाशांना खाली उतरून पावसात आणि पुरात पुढच्या बसची वाट पाहण्यास कसे सांगू शकतो? म्हणुन मी एका हाताने बस आणि एका हाताने वायपर चालवला”

    एकीकडे सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून “निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान” असे एसटी महामंडळाच्या बसवर जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे याच एस टी महामंडळाच्या बसची अवस्था सांगणारे काही चलचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

    नागरिकांच्या जीवाशी खेळ! छप्पर उडालेल्या भंगार अवस्थेतील ST बसमधून सुरू आहे धोकादायक प्रवास
    धावत्या बसचं छप्पर उडालं

    एसटी महामंडळाच्या बसचा बिघाड होणे, छत गळणे यामुळे एसटी महामंडळाच्या बस सेवेवरुन प्रवाशांचा आधीच विश्वास उडालाय. मात्र पर्याय नसल्याने प्रवासी जीव धोक्यात घालून एसटीनेच प्रवास करतात. २६ जुलै रोजी गडचिरोली ते चामोर्शी मार्गावर तेच पाहायला मिळाली. चक्क धावत्या एसटी बसचे छप्पर उडल्याचं चलचित्र व्हायरल झालं. अहेरी आगारातील एमएच -४० वाय-५४९४ क्रमांकाची ही बस असून सकाळी ६ वाजताच्या सुमारास अहेरी आगारातून सुटली. ही बस अहेरी-मुलचेरा-गडचिरोलीला जाऊन गडचिरोलीवरून अहेरीला परत येताना धावत्या बसचे छप्पर उडाल्याचे दिसून आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed