• Mon. Nov 25th, 2024
    सर्पदंशानंतर चार रुग्णालयांचे उंबरे झिजवले, १२ वर्षीय बालिकेचा तडफडून मृत्यू

    रायगड : पेण तालुक्यातील जिते येथील बारा वर्षीय मुलीला सर्पदंश झाला. मात्र त्यानंतर योग्य उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ही घटना घडल्याने तालुक्यातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.

    रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जिते गावातील सारा ठाकूर या १२ वर्षीय मुलीला साप चावला होता. साराला मंगळवारी रात्री मण्यार जातीच्या विषारी जनावराने दंश केला. तिला उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे योग्य उपचार न झाल्याने साराच्या कुटुंबीयांनी तिला पेण येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले.

    आजीची तब्येत बिघडली, भेटीला आलेला नातू पायरी चढतानाच कोसळला, एकाच वेळी दोन अंत्ययात्रा
    खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सारावर उपचार करण्यास असमर्थता दर्शवल्याने तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर कळंबोली येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे. सारा हिच्या मृत्यूने जिते गावावर शोककळा पसरली आहे.

    पत्रकार परिषदेच्या काहीच वेळानंतर संजय राऊतांच्या निवासस्थानी दिसला साप

    अल्पवयीन असलेल्या साराचा झालेला मृत्यू हा सगळ्यांनाच चटका लावणारा ठरला आहे या सगळ्याला आरोग्य विभागाचे प्रशासनच दोषी आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आमची सारा गमावली ,असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे

    जिते गावातील सर्पदंशाची रुग्ण सारा रमेश ठाकूर वय वर्षे १२ हिला उपचारासाठी रात्री दोनच्या सुमारास दाखल करण्यात आली. तिच्यावर विषाची मात्रा कमी करण्यासाठी योग्य ते उपचार करण्यात आले आहेत. केस आणतानाच गंभीर अवस्थेत होती. सतत उलट्या होत होत्या. अशा परिस्थितीत आयसीयू रूम नसल्याने आम्ही तिला अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अलिबाग येथे नेऊन उपचारासाठी पाठविले.

    – डॉ. राजपूत मॅडम, पेण उपजिल्हा रुग्णालय, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, पेण

    साराच्या मृत्यूची खबर मिळताच ठाकूर कुटुंबासह जिते गावातील शाळकरी मुले, शिक्षक, ग्रामस्थ, नातेवाईक यांनी शोक व्यक्त केला. शाळेतील आवडती विद्यार्थिनी सारा आता सातवीच्या वर्गात दिसणार नाही. याबाबत तिच्या वर्गमैत्रिणींनाही दुःख अनावर झाले. आमची सारा आम्हाला सोडून गेली हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

    पाणी देऊ नका, नाहीतर… छातीदुखीने बेशुद्ध प्रवाशाला जीवदान, शिकाऊ नर्सनी सांगितला प्रसंग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *