चंद्रपूर शहरात आज ( बुधवारी ) धो धो पाऊस बसरला.जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे एकच दाणादाण उडाली. सलग दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले. तर जिल्हातील अनेक भागात विजाचा कडकडासह पाऊस झाला. वीज अंगावर कोसळल्याने जिल्ह्यात दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा येथील गीता ढोंगे ही महिला शेतकामे आटोपून घराकडे निघाली होती. दरम्यान तिच्या अंगावर विज कोसळली. वीज कोसळल्याने घटनास्थळीच गीताचा मृत्यू झाला. मृतक महिलेच्या मागे पती, दोन मुली, सासू असा आप्तपरिवार आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
दुसरी घटना गोंडपिपरी तालुक्यातील आहे.चिवंडा या गावातील गोविंदा टेकाम हे वन विभागाचा कामावर होते. जंगलात वृक्ष लागवड सुरु होती.वृक्ष लागवड करीत असतानाच गोविंदा टेकाम यांच्या अंगावर विज कोसळली. विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तिसरी घटना कोरपणा तालुक्यातील खैरगाव ( सावलहिरा ) येथे घडली आहे. चनई बू.येथील शेतकरी पुरुषोत्तम अशोक परचाके (२५) हे शेत पिकाची फवारणी करण्यासाठी शेतात गेले होते. फवारणी करीत असताना त्यांचा अंगावर विज कोसळली. यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. सदर शेतकऱ्याचे चार महिन्या पूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई वडील, मोठा भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी उद्या रेट अलर्ट
या तीन घटनानी जिल्हात शोककळा पसरली आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याला आज ऑरेंज तर उदयाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.